भिवंडी : तालुक्यातील कवाड गावात दुचाकीने घरी चाललेल्या कॉलेज तरूणांना हुलकावणी देणाऱ्या कार चालकास जाब विचारला असता कार मधील तरूणांनी दुचाकीवरील तरूणांना बेदम मारीत त्यांच्या भावासह त्यांच्यावर तलवारीने वार केल्याची घटना कवाड गावात घडली असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ऋतिक दशरथ जाधव (१७) व स्वप्नील दशरथ जाधव (२०) असे तलवारीच्या वाराने जखमी झालेल्या दोन्ही सख्या भावांची नावे असून दोघेही कवाड येथे रहात आहेत. तर त्यांना मारहाण करून तलवारीने वार करणारे सागर जाधव , रोहन जाधव , निकलेश जाधव , नितीन , सतीश व स्वप्नील हे आरोपी देखील कवाड गावात रहात आहेत. ऋतीक दशरथ जाधव हा आपला मित्र पंकज पंढरीनाथ दुमाडा (१७)याच्या सोबत मोटरसायकल वरून घरी जात असतांना कवाड गावातील सखाराम मंदिर येथे पांढºया रंगाच्या कारने दुचाकीला हुलकावणी दिली.त्यामुळे दुचाकीवरील तरूणांनी कारचालकास जाब विचारला. त्याचा राग येऊन कार मधील सागर ,रोहन ,निकलेश, नितीन यांनी दुचाकीवरील पंकज व ऋतिक यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरु वात केली. ही घटना ऋतीकचा भाऊ स्वप्नील दशरथ जाधव यास समजल्याने तो भांडण सोडविण्यासाठी आला असता यातील आरोपी सतीश याने स्वप्नील जाधव यांच्या पाठीवर तलवारीने वार केले तर कारमधील आरोपी स्वप्नील याने देखील त्यास लाकडी दांड्याने व तलवारीने मारहाण केली. या हाणामारीत ऋतिक व त्याचा भाऊ स्वप्नील हे दोघे जखमी झाले असुन त्यांच्यावर येथील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र पोलीसांनी आद्याप वार करणाºयांना ताब्यात घेतलेले नाही.
भिवंडीत किरकोळ कारणावरून सख्या भावांवर तलवारीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:44 IST
भिवंडी : तालुक्यातील कवाड गावात दुचाकीने घरी चाललेल्या कॉलेज तरूणांना हुलकावणी देणाऱ्या कार चालकास जाब विचारला असता कार मधील ...
भिवंडीत किरकोळ कारणावरून सख्या भावांवर तलवारीने हल्ला
ठळक मुद्देदुचाकीवरून घरी चाललेल्या तरूणांना कारची हुलकावणी कार चालकास जाब विचारल्याने आला रागकारमधील तरूणांनी केले दोघांवर तलवारीने वार