शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस श्रेष्ठींच्या तंबीनंतर नाराजांची तलवार म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:41 IST

मनोज शिंदे पहिल्या रांगेत : आव्हाडांचा करवून घेतला सत्कार

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्याबाबतचे आदेश पक्षाने देऊनही काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गटाने असहकार केल्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन कानउघाडणी केल्यानंतर आता शिंदे यांचा गट सुतासारखा सरळ आला आहे.

आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच प्रचार करू, असा इशारा शिंदे यांनी दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यावर काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह नाराज मंडळींनी राष्टÑवादीपेक्षा काँग्रेसच परांजपे यांना जास्त मते मिळवून देईल, असा नारा देत यू टर्न घेतला.ठाणे शहर काँग्रेसमधील ब्लॉक अध्यक्षांनी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील, त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेणारे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवले होते. तत्पूर्वी काँग्रेसमधील पूर्णेकर गटाने राष्टÑवादीच्या उमेदवाराला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केल्याने काँग्रेसमधील दोन गटांमधील वाद उफाळून आल्याचे दिसले. राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेत, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत अगोदर तोडगा काढला होता. त्यानंतरही ठाण्यातील काँग्रेसच्या काही मंडळींनी राष्टÑवादीविरोधात असहकार पुकारला होता. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्या तरच आम्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करू, असेही स्पष्ट केले होते. मागण्या अमान्य झाल्यास मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला होता. राष्टÑवादीच्या नेत्यांनी ही बाब काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणली. काँग्रेसच्या श्रेष्ठींकडूनही नाराज मंडळींची कानउघाडणी झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याला या नाराजांना राष्टÑवादीने पहिल्या रांगेत जागा देऊ केली.

विशेष म्हणजे नाराज मनोज शिंदे यांच्या हस्ते राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याच पक्षातील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी नाराज मनोज शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांची भरसभेत कानउघाडणी केली. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून सर्व राजी असल्याचे त्यांनी सांगितले. परांजपे यांचे काम करायचे असल्याचा आदेश राहुल गांधी यांचा असून ज्यांना काम करायचे नसेल, त्यांनी खुशाल घरी बसावे, असा निर्वाणीचा सूर त्यांनी लावला.काँग्रेसमधील गटबाजीची कबुलीकाँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षातील गटबाजी संपवण्यात आम्हाला यश आले नसल्याची कबुली यावेळी दलवाई यांनी दिली. मात्र, त्याचवेळी राष्टÑवादीने ही गटबाजी संपुष्टात आणली असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडल्याने ही बाब आघाडीसाठी नक्कीच जमेची बाजू असली, तरी हा नाराज गट प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात कसा व कितपत सक्रिय होतो, याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.स्थानिक नाराज नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर प्रामाणिकपणे काम करण्याच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निवडणूक कामातून अंग काढायचे, असे विश्वासघातकी प्रकार होणार नाहीत, याकडे पक्षस्तरावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे