शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांवर टांगती तलवार, कोकण विभागीय आयुक्तांकडे २४ ऑगस्टला सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:35 IST

हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांना ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्याचा आदेश दिला. तसेच २४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणी ठेवल्याची माहिती भाजपचे गटनेते व शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली.

सदानंद नाईक - 

उल्हासनगर : महापालिका महापौर निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यां ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांवर नगरसेवक पद रद्द होण्याही टांगती तलवार उभी ठाकली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २४ ऑगस्ट रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे याप्रकारणी सुनावणी होणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका महापौर पदाची निवडणूक नोव्हेंबर २०१९मध्ये पार पडली. भाजपतील ओमी कलानी समर्थक ९ नगरसेवकांनी व्हीपचे उल्लंघन करून पक्षाच्या उमेदवारीऐवजी शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना मतदान केल्याने, त्या महापौर पदी निवडून आल्या. याविरोधात भाजपने कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. 

दरम्यान, प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांना ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्याचा आदेश दिला. तसेच २४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणी ठेवल्याची माहिती भाजपचे गटनेते व शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. याप्रकारने ओमी टीम समर्थक नगरसेवकात खळबळ उडाली असून नगरसेवक या प्रक्रियेतून सहीसलामत बाहेर पडणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली. 

महापालिका महापौर निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांवर टांगती तलवार लटकत असताना, भाजपाने प्रभाग व विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या १२ नगरसेवकांवरही कारवाई करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली. यामध्ये भाजपातील ओमी कलानी टीम व जीवन इदनानी समर्थक १२ नगरसेवकांचा समावेश आहे. महापौर निवडणुकीपूर्वी साई पक्षाचे बहुतांश नगरसेवक अधिकृतपणे भाजपत सामील झाले होते. तशी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंद आहे. साई पक्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत साई पक्षाच्या नगरसेवक आशा इदनानी यांनी दिले. 

पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई हवीच - जमनुदास पुरस्वानी

 महापालिका निवडणुकीत भाजप विकास आघाडीला नागरिकांनी स्पष्ट बहुमत देऊन पक्षाच्या मीना आयलानी महापौर पदी निवडून आल्या. मात्र अडीच वर्षानंतर महापौर निवडणुकीत पक्षाच्या ९ नगरसेवकांनी पक्ष्याच्या व्हीपचे उल्लंघन करून पक्षाच्या उमेदवाराऐवजी शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना मतदान करून महापौर पदी निवडून आणले. अशा नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द व्हायला हवे, असे मत भाजपचे गटनेते व शहारजिल्हाध्यकक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी व्यक्त केले. 

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाPoliticsराजकारणHigh Courtउच्च न्यायालय