शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या आयुष्यात आला गोडवा, दोन मुलींकडून साखरशाळा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:28 IST

School News : पुण्याच्या दोन मुलींनी चक्क पडघा गावाजवळील आपल्या शेतावरच या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी सरकारती मदत न घेता, साखरशाळा हा उपक्रम राबवत आहे.

वज्रेश्वरी : ऊसतोडणी मजूर तोडणीसाठी सतत स्थलांतरित होत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून या मुलांसाठी साखरशाळा हा उपक्रम राज्य सरकारकडून राबविण्यात येतो, परंतु पुण्याच्या दोन मुलींनी चक्क पडघा गावाजवळील आपल्या शेतावरच या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी सरकारती मदत न घेता, साखरशाळा हा उपक्रम राबवत आहे.पुण्याच्या अश्विनी आणि रणजीत दरेकर यांची पडघा येथे शेती आहे. ते गेली चार वर्षे या शेतातील १४ एकर जमिनीवर यशस्वी उसाचे उत्पादन घेत आहेत. या वर्षीही त्यांनी ऊस लागवड केली आणि ते तोडण्यासाठी त्यांनी मालेगावहून मजूर आणले होते. या मजुरांसोबत त्यांची २२ ते २५ मुलेही आली होती. लॉकडाऊनमुळे सतत घरी असल्याने, त्यांनी यावेळी आपली ११ वर्षांची मुलगी दिविजा हिला सोबत आणले होते. दिविजा रोज या मुलांसोबत खेळत असत. त्यावेळी ती त्यांना गोष्टी, गाणी म्हणून दाखवत असत. तेव्हा तिला वाटले की, आपण यांना आपल्याला शाळेत जे शिकवितात, ते थोडं-फार शिकवू शकतो. तिने आपली मैत्रीण सेजल पवार हिलाही आपल्या शेतावर बोलवून घेतले आणि सुरुवात झाली साखरशाळा उपक्रमास.या दोघीही ३ ते १३ वर्षीय मुलांना रोज सकाळी लवकर उठवून प्रार्थना, त्यानंतर योगासने, सूर्यनमस्कार करण्यास शिकविले. त्यांच्याबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळू लागल्या. त्यामुळे सुरुवातीला लाजणारी ही मुले त्यांच्यात एकरूप होऊन गेली. तेव्हा त्यांना मराठी, इंग्रजी अक्षर, अंकओळख, चित्रकला, वेगवेगळे साहित्य वापरून कागदावर चित्र बनविणे, दगडावर रंगांच्या मदतीने चित्र काढणे, कागदी वस्तू बनविणे असे शिक्षण देऊ लागल्या. याशिवाय त्यांनी या मुलांना आहार, स्वच्छता, आरोग्य शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले. सतत १५ दिवस या मुलांना त्यांनी रोज शिक्षण दिले. दिविजा आणि सेजल घेत असलेल्या साखरशाळेची माहिती मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांना समजल्यावर, त्यांनी या दोघींचे कौतुक करून भिवंडीतील आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून या सर्व मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली. या ऊसतोडणी मजुरांना बालविवाह, आरोग्य आणि शिक्षण याबद्दल माहिती दिली. तर या दोघींमध्ये मला १५ दिवसांत खूप बदल जाणवला. त्यांना या प्रक्रियेतून जाताना खूप आनंद देणारे होते. त्या मुलांबद्दलची भावना, जाणीव यामुळे या दोघींच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली आणि हे भविष्यात त्यांना खूप पुढे घेऊन जाईल.    - अश्विनी दरेकर, दिविजाची आई

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे