शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

स्वप्नील शेटे यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:33 IST

ढाका येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मान

- मुरलीधर भवार कल्याण : बांगलादेश येथील ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात त्रिज्या या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, दिग्दर्शन आणि चित्रपट, असे पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण करणारे स्वप्नील शेटे हे कल्याणचे रहिवासी आहेत. शेटे यांच्या छायाचित्रणाची दखल घेऊन त्यांना या महोत्सवात सन्मानित केल्याने कल्याणकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कल्याणच्या लालचौकी परिसरात ते राहतात. ते छायाचित्रण क्षेत्रात १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘दूरदर्शन’वरही त्यांनी काम केले आहे. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. तसेच पदविकेपर्यंतचे शिक्षणही घेतले आहे.छायाचित्रणात गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या स्वप्नील यांनी यापूर्वी ‘पठार’ व ‘भूक’ या गाजलेल्या लघुपटांचे तसेच ‘शोध तथागत बुद्धांच्या पदचिन्हांचा’ हा माहितीपट छायाचित्रित केला आहे. ‘नेमाडे’सारख्या गाजलेल्या धाटणीचा चित्रपटही त्यांनी केला आहे.

बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वप्नील यांनी छायाचित्रण केलेल्या ‘त्रिज्या’ला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाने गौरविले गेले. ‘त्रिज्या’चे दिग्दर्शन अक्षय इंडीकर यांनी तर, निर्मिती बॉम्बे बर्लिन फिल्मने केली आहे. यापूर्वी शांघाय चित्रपट महोत्सवात या चित्रपटास सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, दिग्दर्शन आणि चित्रपटाची तीन नामांकने मिळाली होती. इस्टोनियातील ‘ब्लॅक अ‍ॅण्ड नाइट्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही ‘त्रिज्या’ची निवड झाली होती.

स्वप्नील शेटे म्हणाले की, ‘मी पाहिलेला निसर्ग, वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट यातून माझे छायाचित्रणाचे कौशल्य सुधारत गेलो. त्यात माझ्या गुरू व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. छायाचित्रण हा अथांग सागर आहे. त्या सागरातील पाण्याचा स्पर्श आता कुठे माझ्या पायाला होत आहे. चित्रपट करताना एक विशिष्ट वातावरण व पोत गरजेचे असते.’

ते पुढे म्हणाले, ‘दिग्दर्शकाच्या संमतीने छायाचित्रण करणे मला खूपच आवडते. चित्रपटाच्या कथेला साजेशी लोकेशन, त्यातील प्रकाश व रंगयोजना यांचा उपयोग करून सिनेमा रचत जाणे हे खरोखरच आनंददायी असते. दिग्दर्शकाच्या कल्पनेतील विश्व तयार करायचे असते. चित्रपटाचे कलात्मक आणि व्यावसायिक वर्गीकरण करणे मला आवडत नाही. मी सगळ्या प्रकारचे चित्रपट पाहतो.’

पिंगबिंग, डॉयल आवडते छायाचित्रकार

मराठीतील अविनाश अरुण, संजय मेमाणे, बॉलिवूडमधील पंकज कुमार, हेमंत चतुर्वेदी, कैको नाकाहरा, हॉलिवूडमधील रॉजर डिकीन्स, इमॅन्युल ल्यूबेस्की तसेच जागतिक चित्रपट करणारे मार्क ली पिंगबिंग, ख्रिस्तोफर डॉयल हे छायाचित्रकार मला आवडतात, असे स्वप्नील शेटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे