शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि एसटीपी प्लांट, अशा दोन्ही सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शहरांना हगणदरी २ प्लसचे प्रमाणमिळते. महापालिकेच्या हद्दीत या दोन्ही सुविधा असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हे प्रमाणपत्र देण्यात आले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेस ११४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ काही टक्के रक्कम सरकारकडून मिळणार होती. तर, उर्वरित रक्कम महापालिकेने उभारणे अपेक्षित होते. महापालिकेने या अभियानांतर्गत कचरा उचलणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. तसेच ६० कोटी रुपये उंबर्डे व बारावे घनकचरा प्रकल्प उभारणे, शास्त्रोक्त पद्धतीने आधारवाडी डम्पिंग बंद करणे, यावर खर्च करण्यात येणार आहेत.स्वच्छ भारत अभियान महापालिका हद्दीत २०१४ पासून सुरू आहे. गेल्या चार वर्षांत महापालिकेस केवळ हगणदरीमुक्तीचे प्लस वनचे प्रमाणपत्र मिळाले होते. एका वर्षात महापालिकेस कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. दरवर्षी केंद्र सरकारचे पथक पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेते. महापालिकेने झोपडपट्टी परिसरातील ८३ सार्वजनिक शौचालये व रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणची २० सार्वजनिक शौचालये सुस्थितीत असल्याचा अहवाल तयार केला होता. त्यापैकी २६ सार्वजनिक शौचालयेही ही उत्कृष्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, पथकाच्या पाहणीनंतर २६ सार्वजनिक शौचालयांपैकी २१ अस्वच्छ आढळली नाहीत. तसेच वाईट स्थितीतही नव्हती.एक सार्वजनिक शौचालय अत्यंत चांगले आढळून आले. तर पाच सार्वजनिक शौचालये अत्यंत स्वच्छ दिसून आली. उर्वरित १७ शौचालयेही चांगल्या स्थितीत आढळून आली. त्याचबरोबर आधारवाडी, बारावे, टिटवाळा आणि टिटवाळा पश्चिमेतील मलशुद्धीकरण केंद्रांची पथकाने पाहणी करून तेथे योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात आहे का, याची पाहणी केली. त्याचबरोबर प्रक्रियेनंतर खाडी व नदीत सोडण्यात येणाºया पाण्यात बीओटी व सीओडीचे प्रमाण किती आहे, याचीही तपासणी केली. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे का, याचीही पाहणी केली.अशी केली पाहणीमहापालिका हद्दीत साडेचार लाख मालमत्ता आहेत. त्यात वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली गेली.सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात आहे की नाही. त्याचबरोबर कोणी उघड्यावर शौचास बसत नाही ना याचीही पाहणी पथकाने केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान