शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस बंदोबस्तात असलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू? पोलिसांसह मुलीच्या नातेवाइकांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 09:58 IST

Bhiwandi Crime News: प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप  केला आहे.

 भिवंडी - प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. अनिकेत बाळाराम जाधव (वय २५, रा. पाच्छापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पाच्छापूर येथील अनिकेतचे नात्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. त्यातून ते दोघे पळून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वासिंद पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान दोघे दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक मुलीच्या मावस भावाला सोबत घेऊन गेले. दोघांना ताब्यात घेऊन दिल्ली येथून राजधानी एक्स्प्रेसने कल्याणकडे  येताना मध्य प्रदेशमधील मुरौना या भागात गाडी आली असता तेथे अनिकेतने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाच्या खिडकीतून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांनी दिली. 

मानवी हक्क आयोगाकडे तक्रार  अनिकेत दोन महिन्यांपासून घराबाहेर असताना मुलीचे कुटुंबीय व मावसभाऊ सुमित नागवंशी वेळोवेळी येऊन अनिकेतला संपवून टाकू, अशी धमकी देत होते.  मुलीचा मावसभाऊ हा वासिंद पोलिसांसोबत दिल्ली येथे गेला होता. पोलिस बंदोबस्त असताना अनिकेतने शौचालयाच्या खिडकीतून उडी मारलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे.  अनिकेतच्या कुटुंबीयांनी ठाणे पोलिस अधीक्षक व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करून न्याय मागितला आहे.

न्याय मिळवून देणारअनिकेतचा मृत्यू हा संशयास्पद आहे. पोलिस बंदोबस्त असताना अनिकेतने रेल्वे गाडीच्या शौचालयातून उडी मारून आत्महत्या केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत अनिकेतला न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस ॲड. किरण चन्ने यांनी दिली आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी