शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

'पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने आयुक्तांना निलंबित करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:22 IST

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी; प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई केली बंद

मीरा रोड : राज्यात कायद्याने बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रेत्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा व्हावा यासाठी प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई पालिकेने बंद केली आहे. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून याप्रकरणी आयुक्तांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह त्यांना निलंबित करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपालांसह शासनाकडे केली आहे. शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री सुरू असून कचरा आणि नाले - खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या पशिव्या येत आहेत.गेल्या वर्षी शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिक ग्लास, चमचे, स्ट्रॉ, प्लास्टिक कंटेनर डबे, थर्माकॉल आदींवर कायद्याने बंदी आणली होती. महापालिकेने शासनाच्या बंदीनुसार जून २०१८ पासून कारवाईला मोठा गाजावाजा करत सुरवात केली होती. नंतर राजकीय हस्तक्षेपामुळे नगरभवन येथे झालेल्या बैठकीत आयुक्तांनी ही कारवाई ८ दिवसांसाठी परस्पर बंद केली. वास्तविक त्यानंतर पालिकेने प्रभावीपणे कारवाई केलीच नाही.शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा बेकायदा उल्लेख करून प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर केला जात असल्याचे समोर येऊनही पालिकेने कारवाई केली नव्हती. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भार्इंदरमध्ये येऊन कारवाई केली. त्यावेळीही पालिकेने घाऊक विक्रेत्यांकडील प्लास्टिकचा प्रचंड साठा सोडून दिला होता. मात्र, ‘लोकमत’ने त्याला वाचा फोडल्यावर पालिकेने २ हजार किलो प्लास्टिक पिशव्या एकट्या भार्इंदर पूर्वेच्या प्लास्टिक बाजारातून जप्त केल्या होत्या. त्यानंतरही पालिकेने प्लास्टिक पिशव्या, चमचे, डबे, स्ट्रॉ आदी बंदी असलेल्या वस्तूंविरोधातील कारवाई केलीच नाही. एखाद्याने तक्रार केली तर तेवढ्यापुरता कारवाईचा दिखावा केला जातो आहे.ही प्लास्टिक बंदी गुंडाळून आयुक्त बालाजी खतगावकर यांनी शासन कायद्याला केराची टोपली दाखवत आपल्या कर्तव्यात कसूर करून शिस्तीचा भंग केला आहे. प्लास्टिक विक्रेत्यांच्या बक्कळ आर्थिक फायद्यासाठी आयुक्तांनी प्लास्टिक विरोधातील कारवाई बंद केल्याचा आरोप सामजिक संस्थांचे कृष्णा गुप्ता, प्रदीप जंगम, सरिता नाईक आदींसह माजी नगरसेवक रोहित सुवर्णा, माधवी गायकवाड, सुनील कदम, सुनील भगत, गणेश फडके आदींनी केला आहे. कृष्णा तसेच जंगम यांनी तर थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकायुक्तांपासून शासन आणि जिल्हा प्रशासनाकडे आयुक्त खतगावकर यांची तक्रार केली आहे.शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आयुक्तांना सेवेतून तात्काळ निलंबित करून प्रशासकीय आणि फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करावी. त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. विक्रेत्यांना प्रचंड आर्थिक फायदा करून दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी आयुक्तांशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. तसेच त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.वापर सुरूचशासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाचे पालिकेने पालन न केल्याने प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर बेधडक सुरू झाला आहे. रोजच्या कचºयात तसेच खाडी - नाल्यांमध्ये प्लास्टिकचे प्रचंड प्रमाण आढळते. मात्र, यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास प्लास्टिकचा देखील अडथळा ठरणार आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.खाद्य - पेयांसाठी प्लास्टिक वापरले जाऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्याशी पुन्हा खेळ चालवला असून यातून कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची भीती आहे. खाड्या - नाले प्लास्टिकने भरल्याने जलप्रदूषण होऊन खाडी आणि समुद्री जीव नष्ट होत आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकcommissionerआयुक्तenvironmentवातावरण