शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हवालदाराने वाचवला तरुणाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 01:21 IST

वैजोला पुलावरील घटना : साईनाथ कराळे यांनी घेतली पाण्यात उडी

टिटवाळा : कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांविषयी नेहमीच नागरिकांच्या मनात भीती असते. पण, याच पोलिसाच्या वर्दीआड माणूसही लपलेला असतो. याचा प्रत्यय मंगळवारी एका तरुणाला आला. सोनावळे-बापगाव या रस्त्यावर वैजोला गावाजवळील नाल्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकीसह वाहून जाणाºया राहुल पाटील या तरुणाला पडघा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया बापगाव दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार साईनाथ कराळे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात उडी घेत वाचवले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस नाईक डी.आर. पाटीलही घटनास्थळी होते.

बापगावमधील जय मल्हारनगर येथे राहणारा राहुल हा तरु ण सोनावळे येथील एका गोडाउनमध्ये सिक्युरिटीचे काम करतो. ड्युटी संपवून तो सोनावळेमार्गे दुचाकीवरून मंगळवारी रात्री ९.३० वाजता घरी परतत असताना वैजोला येथील नाल्याच्या पुलावरून वाहणाºया पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो दुचाकीसह वाहून जाऊ लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत त्याने दुचाकी सोडून दिली आणि नाल्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला पकडून राहिला. त्याचवेळी त्याने मोबाइलवरून पुणे येथील नातेवाइकांना फोन लावून सर्व प्रकार कळवला. त्यांनी तत्काळ ठाणे कंट्रोलला फोन करून या घटनेची माहिती दिली. ठाणे कंट्रोलवरून पडघा पोलीस ठाण्याला फोन केला. याबाबत ९.४५ वाजता बापगाव पोलीस चौकीवरील पोलीस नाईक पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी कराळे यांना सोबत घेऊ न घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा राहुल हा प्रवाहापासून बचाव करण्यासाठी विजेच्या खांबाला पकडून असल्याचे बॅटरीच्या उजेडात पाटील आणि कराळे यांनी पाहिले. तेव्हा कराळे यांनी मागचापुढचा विचार न करता कपडे काढून नाल्याच्या प्रवाहात उडी घेतली आणि राहुल याला सुखरूप नाल्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. तेव्हा राहुल घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला कराळे आणि पाटील यांनी धीर देत दुचाकीवरून घरी सोडले. दोन्ही पोलीस त्याच्यासाठी देवदूत ठरले. पोलिसांनी बजावलेले कर्तव्य आणि दाखवलेली माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.तरुणाने वाचवले बालिकेचे प्राण : धोधो कोसळणाºया पावसामुळे आलेल्या पुरामुळे कल्याण ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री हाहाकार उडाला होता. मोहनेमधील यादवनगरमध्ये एका घरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या बालिकेचा जीव प्रशांत तरे या तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे वाचू शकला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत यांच्यासह अजय कोट, कैलाश कोट, नंदू पांडे यांनी ४० ते ५० लोकांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :thaneठाणेfloodपूरMumbaiमुंबई