शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, १९ व्या मजल्यावरून घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 08:10 IST

१९ व्या मजल्यावरून घेतली उडी: परीक्षेच्या ताणातून उचलले पाऊल

ठाणे : दहावीच्या परीक्षेच्या तणावातून ठाण्याच्या नीळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन ओम मनीष मिश्रा (१५) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या ओम याची सध्या शालांत परीक्षा सुरू होती. तो २६ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतला होता. १९ व्या मजल्यावरील आपल्या घराच्या गॅलरीत तो उभा असताना आजचा विज्ञानाचा पेपर चांगला गेला नसल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या टर्मला मात्र मी चांगला अभ्यास करून पेपर देईल, असेही तो सांगत होता. नंतर वडिलांनी त्याची समजूत घालण्यापूर्वीच त्याने तणावातून आईवडिलांसमोरच १९   व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. खाली कोसळल्यानंतर त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मिश्रा कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा अशाप्रकारे मृत पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेssc examदहावीexamपरीक्षा