शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, डोंबिवलीतील घटना; अभ्यासाचा तणाव की हिंदीच्या शिक्षिकेचे दडपण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:14 IST

अभ्यासाच्या ताणामुळे मुस्कान सिंग (१२) या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. येथील मंजुनाथ विद्यालयात इंग्रजी माध्यमात मुस्कान इयत्ता सातवीत शिकत होती.

डोंबिवली : अभ्यासाच्या ताणामुळे मुस्कान सिंग (१२) या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. येथील मंजुनाथ विद्यालयात इंग्रजी माध्यमात मुस्कान इयत्ता सातवीत शिकत होती.मुस्कान गुरुवारी शाळेतून घरी आल्यापासून तीची मन:स्थिती ठीक नव्हती. हिंदी विषयात तिला कमी गुणमिळाले होते. त्या तणावात असतानाच तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता असल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांसह नातेवाइकांनी शाळेतील हिंदी विषयाच्या शिक्षिकेचे तिच्यावर दडपण होते, असा आरोप केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण आरोपांमध्ये प्राथमिक तपासणीनुसार तथ्य नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.गोग्रासवाडी, नामदेवपथ, ओम दत्तगुरू को-आॅप. हाउसिंग सोसायटीत ब्लॉक नंबर ३८ मध्ये ती कुटुंबासमवेत राहत होती. मुस्कानच्या पश्चात तिची आई, वडील, मोठी बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.शुक्रवारी शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास रामनगरच्या शिवमंदिर वैकुंठ स्मशानभूमीत मुस्कानच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.वर्गातील मैत्रिणींशीही पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण या प्रकारामुळे त्या घाबरल्या असून चौकशीत अडथळे आल्याने पुढील दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून तपासाधिकारी पोलीस निरीक्षक के.बी. चौधरी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.जगायचे नाही, मरायचे!मुस्कानने ‘मला जगायचे नाही, मरायचे’ अशी नोट एका वहीत लिहिली असल्याचेही पोलिसांना आढळले आहे. तसेच गुरुवारी तिच्या पाठीवर मारल्याचे व्रण आढळल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यावर तिने खेळताना पडल्याचे कारण दिल्याचे समजले. जी नोट सापडली आहे, ती नेमकी मुस्काननेच लिहिली आहे का? ते अक्षर तिचेच आहे का? त्याचीही खातरजमा टिळकनगर पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले.‘मुस्कान मंजुनाथ विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात सातवीत शिकत होती. त्या शाळेतील हिंदी विषयाची शिक्षिका साधारण दोन महिन्यांपूर्वी ओरडली होती. तेव्हादेखील मुस्कानची आई शाळेत गेली होती. त्यावेळी शिक्षकांना ती भेटली होती. कोणी रागावले तर फार मनावर घेते, तिला ओरडू नका, अशी विनंती केली होती. मात्र, गुरुवारीही मुस्कानला हिंदीमध्ये ५० पैकी १८ मार्क पडल्याने त्या शिक्षिकेने मुख्याध्यापिकेकडे नेले होते. त्या तणावाखाली मुस्कान होती.’- विजय सिंग, मुस्कानचे वडील

टॅग्स :Crimeगुन्हा