भिवंडी : आपल्या प्रेम संबंधातील लग्नाला कुटूंबियांचा विरोध होईल या भीतीने ग्रस्त असलेल्या प्रेमी युगुलातील तरु णीने माणकोली येथील आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली तर प्रेयसीच्या आत्महत्येची खबर समजताच प्रियकराने आपल्या चौधरीपाडा येथील राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना तालुक्यातील दोन वेगळ्या गावांत घडल्या असून दोन्ही मृतांच्या कुटूंबात शोककळा पसरली आहे.आरती गुरु नाथ भोईर (२०)व रोशन बाळाराम रंधवी (२३)असे मृत प्रेमी युगुलाचे नांव असुन त्यांनी रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. तालुक्यातील पारीवली गावात रहाणाऱ्या आरती गुरूनाथ भोईर हिची मोठी बहिण सीमा ही माणकोली येथे रहात होती.तीच्या पतीचे मागील वर्षी मृत्यू झाल्याने आरती तीच्याकडे रहात होती. तसेच आरतीची दुसरी बहिण रिना हिचे तालुक्यातील चौधरीपाड्यातील रोशन रंधवी याच्या भावाशी लग्न झाले होते.त्यामुळे आरतीचे त्यांच्या घरी नेहमी जाणे येणे होते. त्यामुळे रोशन बाळाराम रंधवी आणि आरतीचे प्रेमसंबध जुळून आले. लवकरच ते दोघे लग्न करणार होते. मात्र आपल्या लग्नास घरातील लोक तसेच दोन्ही कुटूंबाकडून विरोध होईल,या भितीने ते दोघे ग्रासले होते. त्यामुळे आरती हिने माणकोली येथील आपल्या बहिणीच्या घरांत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना समजताच रोशन रंधवी याने चौधरीपाड्यातील आपल्या घरातील छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पडघा पोलीस ठाण्यात केली आहे.या घटनेमुळे दोन्ही कुटूंबात शोककळा पसरली असुन ‘एक दुजे के लिए’प्रमाणे झालेल्या या प्रेमप्रकरणाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
भिवंडीत प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:11 IST
भिवंडी : आपल्या प्रेम संबंधातील लग्नाला कुटूंबियांचा विरोध होईल या भीतीने ग्रस्त असलेल्या प्रेमी युगुलातील तरु णीने माणकोली येथील आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली तर प्रेयसीच्या आत्महत्येची खबर समजताच प्रियकराने आपल्या चौधरीपाडा येथील राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना तालुक्यातील ...
भिवंडीत प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
ठळक मुद्देआरती गुरु नाथ भोईर हिने बहिणीच्या घरी घेतला गळफासरोशन बाळाराम रंधवी यांने घरात घेतला गळफास‘एक दुजे के लिए’च्या पुनरावृत्तीची तालुक्यात चर्चा