शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरुन उडी घेऊन महिलेचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न: पोलिसांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:59 IST

आधी पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार. नंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडे मागणी. पुन्हा त्याच्या सुटकेसाठी पोलिसांकडे तगादा लावणे अशा अनेक कारणांसाठी तगादा लावणा-या प्रीती केणे या महिलेने मंगळवारी दुसऱ्यांदा एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने सहायक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविले.

ठळक मुद्देयाआधी ठाणे ग्रामीणच्या मुख्यालयासमोरच केला होता आत्महत्येचा प्रयत्न उपचारासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात केले दाखलठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : वेगवेगळ्या कारणांमुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोरच यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणा-या प्रीती त्रिदेव केणे (२४, रा. आंंबिवली, ठाणे) हिने मंगळवारी पुन्हा याच कार्यालयासमोरील पोलीस वसाहतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या इमारतीमधील रहिवासी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी आपला जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविले. तिला सुरुवातीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रीती हिने १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काचेच्या तुकड्याने स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही तिला तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी अडवून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी तिच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. रिक्षाचालक त्रिदेव केणे (३०, रा. खडवली) याच्याबरोबर तिचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले. या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. कौटुंबिक वादातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरूहोता. यातूनच तिने पती आणि सासू, सासºयांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये पतीचे नाव वगळावे, केवळ सासूसासºयांचे नाव फिर्यादीमध्ये ठेवावे, अशी तिची मागणी आहे. तिचा पहिला कायदेशीर घटस्फोट झाला की नाही, याबाबत साशंकता असून, दुसºया विवाहाचीही तिच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. पतीने मात्र ती आपली पत्नी नसल्याचा दावा केल्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. माझे सासू, सासरे हे पती त्रिदेव याला घेऊन गेले आहेत. त्याला भेटू देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणून तिने १७ जुलै आणि त्यापाठोपाठ २३ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील भास्कर या पोलीस अधिकारी वसाहतीमधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. जिन्याच्या खिडकीतून ती पाचव्या मजल्यावरील सज्जाच्या भागात पोहचली. तिथे पाय खाली सोडून बसल्यामुळे तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी त्या भागात उतरुन तिचा जीव वाचविला. त्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे