भिवंडी : बेकायदा इमारतीचे बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. खान कम्पाउंडमधील नागाव येथे बांधलेल्या बेकायदा इमारतीविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग समिती क्रमांक-२ चे कार्यालयीन अधीक्षक प्रदीप काठोळे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह इमारतीत जाऊन रहिवासी, गाळेधारकांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना देत होते. त्या ठिकाणी राहणारा मोहम्मद नासीर मो. याकुब खान तेथे आला व शिवीगाळ करून त्याने दमदाटी केली. तसेच कोणीही इमारत रिकामी करू नका, असे सांगत होता. त्याच वेळी रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत अटक केली. शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला (प्रतिनिधी)
भिवंडीत तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: January 26, 2017 03:08 IST