शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणास यशस्वी सुरुवात, २३ केंद्रांवर लसीकरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 06:18 IST

या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली.

ठाणे :  आठ-दहा महिने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. या आजाराच्या लसीची अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येऊन शनिवारी बहुचर्चित कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा सर्वत्र प्रारंभ झाला. त्यानुसार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत तिचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पहिली लस टोचून घेऊन जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी होण्याचा मान मिळविला. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रोझा गार्डनिया येथे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. वृषाली गौरवार यांनी पहिली लस घेतली. या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली.जिल्ह्यातील ६२ हजार ७५० फ्रंटलाइन वर्करसाठी मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शासनाकडून ७४ हजार कोरोनावरच्या लसी प्राप्त झाल्या. त्यानंतर शनिवारी कोरोनावरील लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील २३ लसीकरण केंद्रांवर सुरुवात करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात एक हजार ८२६ फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. दरम्यान, त्यानंतर शासनाकडून लसीकरणाबाबत ज्याप्रमाणे सूचना प्राप्त होतील, त्याप्रमाणे लसीकरण पुढे सुरू राहणार आहे, असे सांगण्यात आले.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या