शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश; २४ तासानंतर मागण्या मान्य

By नितीन पंडित | Updated: March 5, 2024 20:15 IST

वेगवेगळ्या ठेकेदाराकडे हे कामगार मागील १५ ते २० वर्षांपासून काम करीत आहे.

भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा विभागातील १२३ कंत्राटी कामगारांना किमान वेतन, पगार स्लीप, भविष्य निर्वाह निधीचा तपशील मिळावा या मागणीसाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेने पालिका मुख्यालया समोर सुरू केलेले आंदोलन २४ तासांनंतर मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आले आहे. पालिकेने पाणीपुरवठा विभागातील वॉलमन, पाईप लाईन व बोअर वेल निगा व दुरुस्ती तसेच फिल्टर प्लांट या ठिकाणी काम करण्यासाठी ठेकेदार नेमून कंत्राटी कामगार म्हणून १२३ जणांची नेमणूक केली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ठेकेदाराकडे हे कामगार मागील १५ ते २० वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी मनपा ठेकेदाराला कोट्यावधी रुपये देत असताना ठेकेदार कंत्राटी कामगारांना तुटपुंजे वेतन देऊन कामगारांची आर्थिक पिळवणूक करत आले आहेत.

या प्रश्नासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी पालिका मुख्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.हे आंदोलन मंगळवारी २४ तास पूर्ण झाल्यानंतर अखेर ठेकेदाराने पगार स्लीप व वेतनातील फरक रक्कम दिल्या नंतर स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी महेंद्र निरगुडा यांनी दिली आहे. 

प्रशासन ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप भिवंडी पालिकेने नेमलेल्या बरकत कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास २०२२ पासून वार्षिक रक्कम देऊन त्या माध्यमातून ६४ वॉलमन,पाईप लाईन निगा दुरुस्ती ३०, बोअरवेल निगा दुरुस्ती २५ व फिल्टर प्लांट ७ असे कामगार राबविले जात आहेत.पालिका ठेकेदारास प्रति कामगार २६ हजार रुपये देत असताना ठेकेदार मजूर कामगारांना अवघे १७ ते १८ हजार रुपये देऊन पिळवणूक करीत आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून पालिका या ठेकेदारांना आतापर्यंत पाठीशीच घालत आली आहे असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी