शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सुडवृत्तीने वर्गातील विद्यार्थ्यास केली मारहाण चार विद्यार्थ्यांविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 21:49 IST

भिवंडी : लहान भावास चार दिवसांपुर्वी मारहाण केल्याचा सुड घेण्यासाठी शहरातील सलाउद्दीन आयुबी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वर्गात चार विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांस मारहाण केल्याचा प्रकार घडला असुन पोलीसांनी आद्याप आरोपींना अटक केली नाही.या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील शांतीनगर परिसरात सलाउद्दीन आयुबी इंग्लिश व उर्दू माध्यमाच्या शाळेच्या संकुलात ही ...

ठळक मुद्देलहान भावास मारहाण केल्याचा सुड घेण्यासाठी केली मारहाणवर्गातील सीसीटिव्ही कॅमेºयात घटनाक्रम चित्रीतपोलीसांना चौघा विरोधात केला गुन्हा दाखल

भिवंडी: लहान भावास चार दिवसांपुर्वी मारहाण केल्याचा सुड घेण्यासाठी शहरातील सलाउद्दीन आयुबी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वर्गात चार विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांस मारहाण केल्याचा प्रकार घडला असुन पोलीसांनी आद्याप आरोपींना अटक केली नाही.या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील शांतीनगर परिसरात सलाउद्दीन आयुबी इंग्लिश व उर्दू माध्यमाच्या शाळेच्या संकुलात ही घटना घडली असुन शाळेच्या आवारात मुलांच्या होणाऱ्या भांडणामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेच्या सर्व वर्गात व परिसरांत सीसी टिव्ही कॅमेरे लावलेले आहेत. इयत्ता दहावी अ या वर्गात शिकणारा विद्यार्थी रिजवान अब्दुल कयुम खान(१६) हा विद्यार्थी दुपारी तीन वाजता मधल्या सुट्टीत दहावी ब च्या वर्गातील विद्यार्थ्यांंसोबत बसला असताना त्या ठिकाणी दहावीत शिकणारी चार-पाच विद्यार्थ्यांचे टोळके आले. त्यांनी वर्गाला आंतून कडी लावली आणि त्यापैकी एकाने आपल्या लहान भावाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर चौघांनी मिळून रिजावनला सायकलची चैन,कंबरेचा पट्ट्याने केली. या दरम्यान एकाने कंपासमधील कर्कटकने हल्ला करीत शरीरावर गंभीर जखमा केल्याने रिजवान वर्गातच बेशुध्द पडला. त्यामुळे मारहाण करणा-या टोळक्याने वर्गातून पळ काढला.ही घटना शाळा व्यवस्थापनास समजताच त्यांनी रिजवानच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्याकडे रिजवानला सोपविले. त्यांनी जवळच असलेल्या अपना हॉस्पिटल, इंदिरागांधी हॉस्पिटल नंतर प्राईम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर देखील रिजवान शुध्दीवर आला नाही. त्यास मुंबईतील माझगाव येथील प्रिन्स अलीखान हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तब्बल दहा तासानंतर तो शुध्दीवर आला. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याकडून माहिती घेत आफान शेहजान खान,अब्दुल रहिम शेख,आफताब जुबेर अहमद शेख,जैद या चार विद्यार्थ्यांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील वर्गात सीसीटिव्ही कॅमेरा लावलेला असल्याने मारहाणीचा घटनाक्रम त्यामध्ये चित्रीत झाला आाहे. त्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत असुन पोलीसांनी आद्याप कोणासही अटक केलेली नाही,अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी