शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:18 IST

पालिका प्रशासन उदासीन : खासगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नाही

भार्इंदर : गेल्या २०१२ पासून मीरा-भार्इंदर महापालिकेने शिक्षण विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, आजही बहुतांश खाजगी शाळांत ही यंत्रणाच बसवली नसल्याचे उघड झाले असून ती बसवण्यासाठी पालिका अपघाताची वाट पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.पालिका क्षेत्रात सुमारे चारशेहून अधिक खाजगी शाळा आहेत. त्यात २३२ प्राथमिक, १२५ माध्यमिक, बारावीपर्यंतच्या खाजगी शाळांची संख्या ४५ व १२ महाविद्यालये व दोन तंत्र महाविद्यालयांचा समावेश आहे. २०१२ मध्ये मंत्रालयातील आगीच्या घटनेनंतर शहरातील खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला. प्रशासनाने अग्निशमन विभागाला सर्व खाजगी शाळांचे फायर आॅडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या खाजगी शाळा सोडल्यास बहुतांश शाळांत अग्निरोधक यंत्रणाच बसवली नसल्याचे समोर आले. त्यांना अग्निरोधक यंत्रणा बसवण्याची सक्ती करण्यासाठी अग्निशमन विभागाने त्या शाळांचा पाणीपुरवठाच खंडित करण्याचे पत्र पाणीपुरवठा विभागाला दिले.केवळ कागदी घोडे नाचवण्याखेरीज पालिकेने ठोस कार्यवाही न केल्याने आजही बहुतांश खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणाच नाही. काही शाळांनी केवळ अग्निरोधक सिलिंडर बसवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील कित्येक खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत नसून त्या रहिवासी इमारतीत सुरू आहेत.खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत असाव्यात, यासाठी राज्य सरकारने अनेकदा नियम केले, तर पालिकेनेदेखील त्यावर ऊहापोह केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून आजही रहिवासी इमारतीत शाळा सुरूच आहेत. अशा इमारतीतील शाळांना अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात अडचण होत असल्याने त्यांनी केवळ अग्निरोधक सिलिंडरवरच आपली सुरक्षा मर्यादित ठेवली आहे. त्यातच सिलिंडरची संख्याही पुरेशीनाही.पालिकेनेही आपल्या अखत्यारीतील ३५ शाळांमध्ये अग्निरोधक सिलिंडर बसवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही खाजगी शाळा अशा अडगळीच्या ठिकाणी आहेत की, तेथे एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणेला बचावकार्यात अडथळा येऊ शकतो. यावर प्रशासनाने कारवाई न केल्याने शाळा व्यवस्थापनानेसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले.मोठ्या व स्वतंत्र इमारत असलेल्या खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. रहिवासी इमारतीमधील खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक सिलिंडर बसवण्यात आले आहेत. यानंतरही ज्या शाळांनी अग्निरोधक यंत्रणा बसवलेली नाही, त्याचा आढावा घेऊन ती यंत्रणा बसवण्यासाठी कार्यवाही केली जाईल.-दीपक पुजारी, उपायुक्त, अग्निशमन विभागदोन वर्षांपूर्वी सुमारे ७० खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचे उघड झाले होते. त्यांना सतत नोटीस बजावून ती यंत्रणा बसवण्यास भाग पाडले. काही शाळांनी तीबसवली नसल्यास त्यांना विभागप्रमुखांमार्फत नोटीस पाठवून ती बसवण्याची कार्यवाही पुन्हा सुरू केली जाईल.- सुरेश देशमुख, सहायक अधिकारी, शिक्षण विभाग

टॅग्स :Schoolशाळा