शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 07:08 IST

शाळा प्रशासन, पुरवठादार दोषी! कळव्यातील विषबाधाप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा; तक्रारीनंतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा परिसरातील सहकार विद्यालयात ४५ विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठादारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांच्या तक्रारीनंतर कळवा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. तक्रारीमध्ये मात्र कोणाची नावे टाकण्यात आलेली नाहीत, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.  

कळवा सह्याद्री परिसरातील सहकार विद्या प्रसारक मंडळ या खासगी अनुदानित शाळेत मंगळवारी मटकीची आमटी आणि भात खाऊन ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. पालिकेच्या कळवा रुग्णालयात  सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. कळवा पोलिसांनी पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शाळा प्रशासन आणि पुरवठादार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.

शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेलेराज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे पाहणी दौऱ्यासाठी मध्यरात्री दोन वाजता आल्याने औषधोपचार घेऊन झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना उठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. मंत्री येणार असल्याने पालिका अतिरिक्त आयुक्त, शिक्षणाधिकारी, रुग्णालय प्रशासन आणि सहकार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेतील व्यवस्थापकांना रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. शिक्षण मंत्र्यांच्या या अवेळी दौऱ्याबद्दल पालकांनी तीव्र नाराजी प्रकट केली.

विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर मंगळवारी रात्री कळवा रुग्णालयात तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोषण आहार पुरवणारी संस्था, शाळा प्रशासन आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. आहाराची तपासणी न करताच मंगळवारी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.

एफडीएने ठोकले सीलठाण्यातील अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी शासनाने आशीर्वाद महिला मंडळ या संस्थेला ठेका दिला आहे. सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेलाही याच संस्थेकडून पोषण आहार दिला जातो. विषबाधेच्या घटनेनंतर ज्या ठिकाणी अन्न बनवले जाते त्याठिकाणी जाऊन अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पाहणी केली. यात त्रुटी आढळून आल्याने एफडीएने दुकानाला सील ठोकले.

आठ विद्यार्थ्यांची प्रकृती अद्याप खराबमंगळवार रात्री उशिरापर्यंत एकूण ४५ विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात भरती केले. त्यातील ३७ विद्यार्थ्यांना बुधवारी सुट्टी दिल्याची माहिती रुग्णालयाने दिली. उर्वरित आठ विद्यार्थ्यांमध्ये  ताप व उलट्या ही लक्षणे असल्याने त्यांना अजून बारा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा