एसटीची शिवशाही बस : कल्याण-नगर प्रवास आजपासून गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:46 AM2018-03-06T06:46:48+5:302018-03-06T06:46:48+5:30

एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे.

 ST's Shivshahi Bus: Kalyan-Nagar Yatra is today from Garegaon | एसटीची शिवशाही बस : कल्याण-नगर प्रवास आजपासून गारेगार

एसटीची शिवशाही बस : कल्याण-नगर प्रवास आजपासून गारेगार

googlenewsNext

- पंकज रोडेकर
कल्याण - एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे.
प्रवाशांना आरामदायी बसप्रवास घडावा तसेच खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही बससेवेत आणल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ठाणे ते बोरिवली, ठाणे ते भार्इंदर या स्थानिक मार्गांवर तसेच ठाणे ते कोल्हापूर या लांबच्या मार्गावर या बस धावत आहेत. ठाणे ते बोरिवली मार्गावर आठ शिवशाही बसच्या दिवसभरात ४८ फेºया, तर ठाणे ते भार्इंदर मार्गावर चार बसच्या एकूण २४ फेºया होत्या. तर, ठाणे-कोल्हापूर मार्गावर दोन शिवशाही बस धावत असून त्यांच्या दोन फेºया होतात.
त्यापाठोपाठ आता मंगळवारपासून कल्याण-नगर या मार्गावर ही बस सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार, आजपासून दोन्ही बाजूंनी एकूण २० बस चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटीच्या ठाणे उपविभागीय नियंत्रण विभागाने दिली. सध्याच्या उकाड्यात या वातानुकूलित बसमुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळेल, असा दावाही प्रशासनाने केला.

सकाळी ७.३० पासून फेºया

च्कल्याणहून नगरला जाण्यासाठी सकाळी ७.३० वाजता पहिली शिवशाही बस सुटणार आहे. तर, शेवटची बस सायंकाळी ५ वाजता सुटणार आहे. तसेच नगरहून कल्याणसाठीही सकाळी ७.३० तसेच सायंकाळी ५ वाजता शेवटची बस सुटेल.
च्एसटी प्रशासनाने या प्रवासासाठी आॅनलाइन तिकीट सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्याही आपले तिकीट आरक्षित करता येणार आहे.
 

Web Title:  ST's Shivshahi Bus: Kalyan-Nagar Yatra is today from Garegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.