शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

एसटीचा बेस्ट प्रशासनाला आधार, ५० बस रस्त्यावर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 12:59 AM

चाकरमान्यांच्या मदतीला लालपरी : ५० बस रस्त्यावर धावणार

ठाणे : कोरोनाच्या काळात एसटीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यातील जनतेला मोठा आधार देण्याचे काम केले आहे. मुंबईकरांची धमणी म्हणून गौरविल्या जाणाऱ्या बेस्टलाही एसटीनेच आधार दिला आहे. राज्य परिवहन प्रशासनाने २०० एसटी बेस्टच्या मदतीला उतरवून प्रवाशांची वाहतूक सुरू केली आहे. ठाण्यातूनही एसटीने बेस्टला ५० बस पुरविल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये रेल्वेसह सर्व वाहतूक सेवा बंद असताना एसटीने जनतेला आधार देऊन त्यांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. एसटीचालकांनी लोकांना घेऊन थेट बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या देशांच्या सीमादेखील गाठल्या. शिवाय, भाजीपाला, अन्नधान्याचीदेखील वाहतूक केली. कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे कामसुद्धा एसटी करीत आहे. आता मागणी केल्याप्रमाणे एसटीने बेस्टला २०० गाड्या, ४०० चालक-वाहक पुरविले आहेत. मंगळवारपासून एसटीने हे बळ दिले आहे. ठाण्यातील खोपट, वंदना येथूनही ५० एसटी दिल्या असून त्या मुलुंड ते वरळी, शिवडी अशी प्रवासी वाहतूक करणार आहेत. प्रवाशांसाठी बेस्टचे तिकीट देण्यात येणार आहे. तर, चालक, वाहक एसटीचे असून त्याबदल्यात एसटी प्रशासनाला प्रतिकिलोमीटर अंतरासाठी ७५ रु पये मोबदला दिला जाणार आहे.ठाण्यातून ५० बस दिल्या असून खोपट, मुलुंड येथून त्या सोडल्या जाणार आहेत. गुरु वारपासून ४५ बस बेस्टला हस्तांतरित केल्या आहेत. चालक, वाहक आणि गाडी महामंडळाची असणार आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.- विभागीय नियंत्रकअधिकारी, ठाणे

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका