शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा आणि शीळ येथील गावठी दारुच्या अड्डयांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:38 IST

मोठी देसाई गावाच्या खाडी किनारी भागातील गावठी दारु निर्मिती अड्डयांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन वेगवेगळया पथकांनी मंगळवारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.

ठळक मुद्दे दारुची निर्मिती करणाऱ्या सात जणांचे पलायनसहा लाखांची सामुग्री जप्त करुन नष्टनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई

ठाणे: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी देसाई गावाच्या खाडी किनारी भागातील गावठी दारु निर्मिती अड्डयांवरठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन वेगवेगळया पथकांनी मंगळवारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये सहा लाख १५ हजार ६२० रुपयांचे १२ हजार लीटर दारु निर्मितीचे रसायन नष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा आणि शीळ डायघर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मोठी देसाई गावाच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये खाडी किनारी हातभट्टी लावून दारु गाळण्याचे काम चालते, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे आणि उपनिरीक्षक कैलास सोनावणे यांच्या अधिपत्याखालील दोप वेगवेगळया पथकांनी १२ मार्च रोजी सकाळी या भागात धाडसत्र राबविले. कु-हाडे यांनी शीळ डायघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, अशोक माने, सागर शिंदे, हवालदार अबुतालीब शेख आणि सुभाष मोरे तसेच उपनिरीक्षक कैलास सोनावणे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आदींच्या पथकासह देसाई गावाच्या दुर्गम जंगलामध्ये खाडीकिनारी ही कारवाई केली. त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारु गाळण्याचे काम सुरु होते. पोलीस पथकाची चाहूल लागताच अतुल केले, दिपक केणे, किरण केणे, राहूल केणे, रुपेश म्हात्रे, सचिन पाटील आणि प्रशांत रोकडे आदी दारुची निर्मिती करणाऱ्या टोळीने तिथून खाडीचा फायदा घेऊन जंगलात पलायन केले. शीळ डायघर भागातून गावठी दारु निर्मितीसाठीचे दोन लाख ६५ हजार १२० रुपये किंमतीचे रसायन तर मुंब्रा भागातून तीन लाख ५० हजार ५०० रुपये असा सहा लाख १५ हजार ६२० रुपयांचा दारु निर्मितीचा कच्चा माल आणि सामुग्री जागीच नष्ट करण्यात आली. या दोन्ही प्रकरणामध्ये शीळ डायघर आणि मुंब्रा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरारी आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड