शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई; पोलिसांनासोबत घेऊन करणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 19:07 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.

मीरारोड - कोरोनाचा घातक असा डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मीरा भाईंदर महापालिकेने शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई महापालिका व पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय करणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे. सोमवारी पालिकेने २ दुकानांना सील ठोकत ३९ हजारांचा दंड सोमवारी वसूल केला. 

डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. सदर चर्चेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व डॉ. संभाजी पानपट्टे, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

कोरोनाची तिसरी लाट जास्त धोकादायक ठरणार असून निर्बंधांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन शहरात होणार नाही यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने प्रभागनिहाय प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सोमवारी सायंकाळ पासून रात्रीपर्यंत कारवाई केली गेली. प्रभाग समिती क्रमांक ०५ मध्ये नियमांचे  उल्लंघन करणाऱ्या २ दुकानांना सील ठोकण्यात आले. एकुण ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून रू.१४ हजार दंड वसूल करण्यात आला व  २० हातगाड्या तोडण्यात आल्या. 

प्रभाग कार्यालय क्रमांक १ भाईंदर (पश्चिम) मध्ये मॅक्सस मॉल मागे शक्ति डोसा दुकानावर दंडात्मक कारवाई करत २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त अजित मुठे, प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, कनिष्ठ अभियंता जटाळकर, योगेश भोईर, प्रभाग कर्मचारी कांबळे, माने व सुरक्षारक्षक यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याmira roadमीरा रोडPoliceपोलिस