शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा करणार आरोग्य विभागाचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 02:06 IST

अर्थसंकल्पात केली भरीव तरतूद; नवीन कोणतीही कामे प्रस्तावित नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी सादर केलेल्या २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह इतर महापालिका रुग्णालयांमध्ये उपकरणे खरेदी करणे, औषधोपचार उपलब्ध करून देणे, तसेच सध्याच्या घडीला विविध रुग्णालयांची सुरू असलेल्या कामांसाठी पुरेसा प्रमाणात निधीची उपलब्ध करून दिला आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थिती खालावली असल्याने सध्यातरी कोणत्याही नवीन प्रस्तावित कामांसाठी निधी दिला नसला तरी भविष्यात आर्थिक स्थिती सुधारताच आरोग्याच्या नव्या प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.ठाणे महापालिकेचे २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक  महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्थायी समितीकडे सादर केले. मात्र, मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम तिजोरीवरदेखील झाला आहे. कोरोनाच्या महाभयंकर पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचे लक्तरे चव्हाट्यावर आली होते. त्यामुळे कोविडकाळात शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून व महापालिका निधीतून आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरण केले. असे असले तरी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी काय? असा सवाल केला जात होता. त्यानुसार आरोग्य सुविधा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच इतर रुग्णालयांमधील उपकरणे आणि इतर कामांसाठी २७ कोटी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या काही काळात ही रुग्णालये सक्षम होणार आहेत. त्याचा लाभ रुग्णांना होईल.२५६.८४ कोटींची खर्चाची तरतूद ठाणे महापालिकेने ही तरतूद केली असली तरी आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी आयुक्तांनी २५६.८४ कोटींची खर्चाची तरतूद प्रस्तावित केली आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था किती महत्त्वाची असते याची जाणीव आता प्रशासनाने झाली आहे. त्यामुळे भविष्यात असे संकट उभे राहिले तर त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच सुरुवात केली आहे.nयामध्ये पूर्वी प्रस्तावित केलेल्या कामांव्यतिरिक्त नव्या कोणत्याही कामांचा समावेश नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका