शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला रोखण्यासाठी आखली रणनीती; आगामी ठाणे महापालिका निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:27 IST

Thane : ठामपाच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या गुप्त बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादीने स्वबळावर लढून निवडणुकीनंतर सत्तेत एकत्रित सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

- अजित मांडके 

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांना अद्याप दीड वर्षाचा अवधी शिल्लक आहे. परंतु, त्याआधीच रणनीती ठरवून भाजपला रोखण्याचे प्रयत्न आघाडीकडून केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे स्वबळावर निवडणूक लढणार आहेत. परंतु, २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते, त्या जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. त्यासाठी शिवसेना त्यांना आतून मदत करणार आहे. भाजपला रोखण्यासाठीच ही रणनीती तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठामपाच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या गुप्त बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादीने स्वबळावर लढून निवडणुकीनंतर सत्तेत एकत्रित सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आगामी निवडणुकीत भाजपचा एकही नगरसेवक निवडून न देण्याचा निर्धार करून काँग्रेसनेही बळाचा नारा दिला आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक विद्यमान नगरसेवक हे भाजपमध्ये दाखल झाले होते. परंतु, आता त्यांना पुन्हा स्वगृही आणण्याची तयारी सुरू आहे. जेथे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, त्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करून शिवसेना त्यांना आतून सहकार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बालेकिल्ला मिळविण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्नजुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा आणि आजूबाजूच्या मध्यवर्ती भागातून शिवसेनेची मागील निवडणुकीत पीछेहाट झाली होती. आता पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना या ठिकाणी राष्ट्रवादीचे सहकार्य घेऊन भाजपला या बालेकिल्ल्यातून हद्दपार करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

प्रथमच होणार शिवसेना विरुद्ध भाजप लढत मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वबळावर लढले होते. परंतु, त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. त्यानंतर, राज्यात महाविकास आघाडी सरकारचे बिगुल वाजले आणि महापालिकेतही राष्ट्रवादी विरोधी बाकावरून थेट महाविकास आघाडीच्या बाजूने झुकली. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत प्रथमच ठाण्यात बघावयास मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणे