शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर उलगडली स्त्री जन्माची कहाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 4:44 PM

अत्रे कट्ट्यावर अखिल भारतीय नाट्य परिषद ठाणे शाखा निर्मित अनादी कालापासून आधुनिक काळापर्यंत स्त्री जीवनाचा प्रवास काव्यात्मकतेतून तसेच निवेदन आणि प्रासंगिक गाण्यातून अनोख्या पद्धतीने गुंफला.

ठळक मुद्देआगळावेगळ्या अनोख्या नाट्यविष्काराची निर्मितीअत्रे कट्ट्यावर उलगडली स्त्री जन्माची कहाणी  वेदकाल ते आधुनिक कालखंडातील स्त्री जीवनाचा आढावा

ठाणे : मागील वर्षी खास महिला दिनाचे औचित्य साधून अ. भा. म. नाट्य परिषद ठाणे शाखेने एका आगळावेगळ्या अनोख्या नाट्यविष्काराची निर्मिती केली. प्रा. पद्मा हुशिंग यांच्या संकल्पनेतून आणि लेखनातून "अशी मी अशी मी "या प्रयोगातून वेदकाल ते आधुनिक कालखंडातील स्त्री जीवनाचा, तिच्या समस्यांचा आणि तिच्या कतृत्वाचा आढावा अत्रे कट्ट्यावर घेतला गेला. 

या कार्यक्रमाचा मूळ गाभा हा कवितेचा आहे परंतु मनोरंजनातून प्रबोधन हा हेतू असल्यामुळे नृत्य, नाट्य, गाणे, अभिनयातून काव्य सादरीकरण आणि दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर केल्यामुळे प्रथम प्रयोगापासूनच रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षापासून अ. भा. नाट्यसंमेलनासहीत दहा प्रयोग झाले असून काल याच कार्यक्रमाचा साहित्यिक भाग कट्यावर पार पडला.हा कार्यक्रम दिडतासाचा असल्यामुळे निवेदन, गायन आणि कवितेतून सादरीकरण करण्यात आले. निवेदिका अश्विनी कानोलकर, गायिका अनुजा वर्तक, आणि आशा जोशी, मृदुला मराठे, जयश्री पाठक आणि स्वता:प्रा.पद्मा हुशिंग यांचा सहभाग होता. शिला वागळे यांनी कलाकारांचे स्वागत केले आणि संपदा वागळे यांनी आभार मानले. अत्रे कट्यावरील नेहमीच्या सुजाण रसिकांची उत्तम साथ  मिळाली. हा मूळ कार्यक्रम अडिचतासाचा दोन अंकी  नाट्य विष्कार असून त्याचाच साहित्यिक भाग दिडतासाचा सादर केला जातो. याच महिन्यात बालगंधर्व रंगमंदीर पुणे आणि पुढे औरंगाबाद, अंबाजोगाई, आणि लातूर असा "अशी मी अशी मी" प्रवास होणार आहे.अत्रे कट्यावर गेले अनेक वर्षे  विविध कलांना उत्तेजन देणारे कार्यक्रम सतत होत असतात आणि येथे येणार्‍या सुजाण रसिक वर्गाची उत्तम दाद कलाकारांना प्रेरणा देणारी असते. कालच्या कार्यक्रमालाही जेष्ठ नागरिक तसेच तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळेच शेवटपर्यंत कार्यक्रम रंगत गेला..

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई