शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

ठाण्यात सराईत चोरट्यासह सराफा व्यावसायिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:49 IST

लोकल प्रवासात मोबाईल आणि सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यातच, सोनसाखळी चोरट्यासह ज्वेलर्सदाराला पकडण्यात लोकमार्ग पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातील सात गुन्हे उघडकीस; सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगतलोहमार्ग पोलिसांची कामगिरी

ठाणे : रेल्वेस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कळव्यातील तारू महंमद अली शेख (२८) या सराईत चोरट्यासह चोरीचे दागिने विकत घेणा-या टिटवाळ्यातील सराफा व्यावसायिक अण्णासो सरक (३९) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करत सात गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून सुमारे १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यांची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वेस्थानकांत सोनसाखळीचोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. याचदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तारू शेख याला अटक केली. चौकशीत त्याने आॅगस्ट महिन्यातील दोन आणि सप्टेंबर महिन्यातील पाच घटनांची कबुली दिली. त्यातील तीन घटनांतील मुद्देमाल सराफा व्यावसायिकाला विकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, त्या सराफा व्यावसायिकास अटक करत, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच इतर चार गुन्ह्यांतील मुद्देमाल तारू शेख याच्या घरातून हस्तगत केला आहे. सात गुन्ह्यांतील १०५.५०० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून त्याची किंमत दोन लाख ९५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींना १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे........................................ 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेPoliceपोलिस