शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे  जिल्ह्यात १ लाख ८०  हजार ५८२ लसींचा साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:17 IST

ठाण्यासह जिल्ह्यात मागील काही दिवसापासून लसींचा साठा अपुरा पडत होता. त्यामुळे अनेक केंद्रावरील लसीकरण बंद करण्यात आले होते. ठाणो महापालिका हद्दीत विकेंड लॉकडाऊनचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु आता सलग दोन दिवस आलेल्या साठय़ामुळे आणि आधीचा काही प्रमाणात शिल्लक असलेल्या साठय़ामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सध्या १ लाख ८० हजार ५८२ लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे तुर्तास तरी लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु राहणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये, १ लाख ५४ हजार ७३२ कोव्हीशिल्ड आणि २५ हजार ८५० कोव्हॅक्सीनचा साठा शिल्लक आहे परंतु हा साठा पुढील किती दिवस चालणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

     ठाण्यासह जिल्ह्यात मागील काही दिवसापासून लसींचा साठा अपुरा पडत होता. त्यामुळे अनेक केंद्रावरील लसीकरण बंद करण्यात आले होते. ठाणो महापालिका हद्दीत विकेंड लॉकडाऊनचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरळीत लसीकरण सुरु झाले आहे. भिवंडीत कोव्हीशिल्डचे ८४५० डोस, ठाणे  महापालिका हद्दीत कोव्हॅक्सीनचे ३ हजार आणि कोव्हीशिल्डचे १४ हजार ८७० डोस शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सीनचे ६ हजार ५५० डोस असून कोव्हीशिल्डचा १७ हजार ४९० डोस उपलब्ध झाले आहेत. तर मिरा भाईंदरमध्ये कोव्हॅक्सीनचे २ हजार ३३० डोस शिल्लक आहेत, तर कोव्हीशिल्डचे १८ हजार २३० डोस शिल्लक आहेत.

नवीमुंबईतही कोव्हॅक्सीनचे ८ हजार २८० डोस शिल्लक असून कोव्हीशिल्डचे १८ हजार ४३० डोस शिल्लक आहेत. तर उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सीनचे ३५० आणि कोव्हीशिल्डचे ३ हजार ७२० डोस शिल्लक आहेत. तर ठाणे जिल्हा ग्रामीण भागासाठी कोव्हॅक्सीनचे ५ हजार ३४० तर कोव्हीशिल्डचे ३३ हजार ४१० डोस शिल्लक आहेत. जिल्ह्याला आलेला साठा पुरेसा नसला तरी सध्या लसीकरण मोहीम पुन्हा एकदा वेगाने सुरु झाली आहे. परंतु पुढील काही दिवसात आणखी लसींचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस