शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात उद्या अन्न अधिकार अभियान करणार राज्यभर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 19:37 IST

- सुरेश लोखंडेठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अधिकार अभियानाने राज्यभर गुरूवारी निदर्शने करण्याचे निश्चित झाले आहे. दोनच सदस्य असणा-या अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशन ...

- सुरेश लोखंडे

ठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अधिकार अभियानाने राज्यभर गुरूवारी निदर्शने करण्याचे निश्चित झाले आहे.

 दोनच सदस्य असणा-या अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशन कार्ड आता रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकण्यात येणार आहे. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणशी पाच किलो धान्य मिळते तर अंत्योदय लाभार्थीना कितीही सदस्य असले तरी ३५ किलो धान्य मिळते. कारण अंत्योदय कुटुंबे सर्वात गरीब आहेत. आदिम जमाती उदा. कातकरी कोलाम, किंवा विधवा/ परित्यक्ता कुटुंबप्रमुख असणारी , दुर्धर आजाराने ग्रस्त असणा-या कुटुंबप्रमुखाचे कुटुंब इ. त्यामधे मोडतात. बहुधा व्रुद्ध पती पत्नी अथवा एकल स्त्रिया व त्यांचे एखादे मुल असणारीच कुटुंबे दोन सदस्य असणारी असतात.( हे निकष सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहेत.) त्यांचे ३५ किलो धान्य आता सबका साथ सबका विकास म्हणणा-या सरकारला डोळ्यात सलू लागले आहे. २१ सप्टेंबरला प्रधान सचिवांनी आदेश काढून सदर कार्डे रद्द करण्यास सांगण्यात आले आहे व पाच माणसांपेक्षा जास्त सदस्य संख्या असणा-या प्राधान्य गटातील कुटुंबांची कार्डे रद्द करून त्यांना अंत्योदय मधे घालावे असेही हा आदेश म्हणतो. हा सगळा तुघलकी कारभार सर्वात गरीब जनतेच्या ताटातले अन्न काढून घेणारा असल्याच्या आरोपा खाली ठाणेसह राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.

प्रधान सचिवांचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणारा असल्याचा आरोप आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेशनवरील साखर देखील बंद करण्यात आली आहे. ती फक्त अंत्योदय कुटुंबांना एकच किलो, ती देखील वाढीव दराने मिळणार आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश छत्तीसगडसारखी राज्ये रेशनवर डाळ, तेल , आटा व अन्य वस्तू देखील देतात पण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी भर घाल ण्याचा दावा करणारे संपन्न महाराष्ट्र राज्य व येथील सरकार सर्वात गरीब कुटुंबांसाठी ही नादानी करते याचा आम्ही तीव्र निषेध  अन्न अधिकार अभियानच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानचे संजीव साने, स्वराज इंडियाचे, उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर यांनी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात दि. १२ ऑक्टोबरला हा निषेध करण्यात येणार आहे.

कोल्हापूर सांगली, नागपुर, पुणे, नंदुरबार, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई , पालघर,अमरावती, रायगड, ठाणे सहित महाराष्ट्रातील विविध ठिकाणी  आंदोलन होणार  आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते दुपारी  ५ वाजता निदर्शन केले जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणे