शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्याने पेट्रोलवर घेण्यात येणारे अतिरिक्त कराचे 10 रुपये कमी करावे; रवींद्र चव्हाण यांनी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 19:23 IST

एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करावा आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला.

डोंबिवली: पेट्रोलने शंभरी पार केली हे वास्तव असले तरी राज्य शासन सुमारे २६ टक्के कर लावते, त्यातही सुमारे आणखी 10 रुपये जास्तीचे आघाडी सरकार घेत आहे, ते त्यांनी कमी करावेत आणि जनतेला दिलासा द्यावा. त्यातून दीड वर्षात करोडो रुपयांचा निधी राज्य शासनाने जमा केला आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करावा आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला.

शिवसेनेने पेट्रोल दरवाढ विरोधात आंदोलन केले त्याबद्दल चव्हाण यांनी बुधवारी माध्यमांजवळ त्यांच्यामते जे वास्तव ते मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की प्रति बॅरल चा रेट काय आहे याचा अभ्यास आघाडी सरकार करत नाही, त्यातच डोंबिवलित जे शिसवसेनेने आंदोलन केले त्यातून स्थानिक कार्यकर्त्यांचा अभ्यास किती कमी आहे हे दिसून येत आहे.

7 वर्षे केंद्र सरकारची यामध्ये 5 साडेपाच वर्षे शिवसेना देखील सत्तेत होती. तेव्हा दरवाढ दिसली नाही का? असा सवाल चव्हाण यांनी केला. सतत भाजपच्या कृतीवर बोलत रहायचे, टीका करायची, त्यालाही हरकत नाही,  पण नागरिकांची दिशाभूल करू नका असा टोला त्यांनी लगावला.तसेच पालकमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत, त्यांनी तरी नागरिकांना दिलासा द्यावा, 10।रुपये कमी करुन द्यावेत. इथल्या स्थानिक आणि बाहेरून आलेल्यानी त्यासाठी पालकमंत्र्यांकडे हट्ट धरावा असेही ते म्हणाले. आंदोलन करताना ते राज्यात सत्तेत आहेत हे ते विसरत असतील, किंवा त्याना नागरिकांची दिशाभूल करायची आहे का? असे चव्हाण।म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPetrolपेट्रोल