शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या देसाई गावातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:09 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने देसाई गावातील खर्डी किनारी गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबवून २१ हजार २०० लीटर रसायनासह पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला.

ठळक मुद्देखर्डी ते आगासन दरम्यान खाडी किनारी धाडसत्रदारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह ४ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : डायघर भागातील देसाई गावातील खाडी किनारी असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने सोमवारीधाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह चार लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील , पी. पी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक एम. टी. वरुळकर तसेच जवान एस. डी. पवार, प्रदीप महाजन आणि शैलेश कांबळे आदींच्या पथकाने २९ जानेवारी रोजी खर्डी ते आगासन दरम्यान असलेल्या खाडी किनारी भागात गावठी हातभट्टीवरील दारु निर्मितीच्या वेगवेगळया तीन अड्डयांवर सकाळी ८ ते १२ वा. च्या दरम्यान कारवाई केली. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे १०६ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे ३१ प्लास्टीकचे ड्रम, रसायनाने भरलेला एक मोठा ढोल तसेच २१ हजार २०० लीटर दारु निर्मितीचे रसायन असा चार लाख ८१ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती अधीक्षक नाना पाटील यांनी दिली. धाडीची चाहूल लागताच खाडी परिसरातून दारु निर्मिती करणा-यांनी पलायन केले. मात्र त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक बोज्जावार यांनी सांगितले. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याठिकाणी जप्त केलेले रसायन तसेच दारु बनविण्याची सामुग्री नष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेExcise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी