शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करा, वकिलांचे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: February 8, 2023 17:45 IST

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करावे अशी मागणी मागील कित्येक वर्षां पासून केली जात होती. त्यासाठी अनेक आंदोलन वकील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली.

नितीन पंडित

भिवंडी : शहरातील वकील व नागरीक यांच्या सोयीसाठी भिवंडीन्यायालय इमारतीमध्ये उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेल्या अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तात्काळ सुरू करण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद करावी व लवकरात लवकर ही न्यायालये सुरू करण्याच्या मागणीसाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने बुधवारी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे निमंत्रक ऍड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मनजीत राऊत,भिवंडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड रवी भोईर,जेष्ठ वकील ऍड यासिन मोमीन,एमआयएम पक्षाचे शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुफैल फारुखी यांसह अनेक वकील व नागरिक सहभागी झाले होते.          

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करावे अशी मागणी मागील कित्येक वर्षां पासून केली जात होती. त्यासाठी अनेक आंदोलन वकील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. उच्च न्यायालयाने त्यास मान्यता देत भिवंडीत दिवाणी वरिष्ठ स्तर जोड न्यायालय सुरू करण्यात आले.या मध्ये फक्त १५ दिवस न्यायालय भिवंडी मध्ये हंगामी सुरू असते तर १५ दिवस ठाणे येथे सुरू असते,त्यामुळे दावे  दाखल करण्यासाठी ठाणे येथेच जावे लागते.तर फौजदारी गुन्हे हे ठाणे न्यायालयातच सुनावणी होत आहेत .त्यामुळे वकील वर्गांसह पक्षकार व पोलिसांना फौजदारी गुन्ह्यांसाठी ठाणे जिल्हा न्यायालयात जावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते तर वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा या प्रक्रियेत दिवसभराचा वेळ वाया जातो .नुकताच भिवंडी न्यायालयाच्या भव्य प्रशस्त अशा इमारतीचे उदघाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या शुभहस्ते पार पडले .या इमारती मध्ये जागा उपलब्ध असतात आज रोजी प्रथमवर्ग दिवाणी व फौजदारी ८ न्यायालय व १ जोड दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय १५ दिवसांसाठी सुरू असते. आता, न्यायालाय इमारती मध्ये जागा उपलब्ध आहे .शहर व तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना गुन्ह्यांची संख्या सुध्दा वाढत आहे.अशा परिस्थितीत भिवंडी शहरात अतिरिक्त जिल्हा सत्र व दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. वरिष्ठ न्यायालय सुविधा नसल्याने सर्वाना न्यायासाठी ठाणे येथे जावे लागत असल्याने वकील पक्षकार पोलीस या सर्वानाच वाहतूक कोंडी मुळे वेळेचा अपव्यय आर्थिक व मानसिक झळ सोसावी लागत असल्याची माहिती धरणे आंदोलनाचे निमंत्रक ऍड किरण चन्ने यांनी दिली आहे.        

सध्या इमारत तयार आहे पण राज्य सरकार तेथील व्यवस्था कर्मचारी वेतन व वेतनेतर खर्च या बाबत आर्थिक तरतूद करीत नसल्याने ही मागणी खोळंबून पडली आहे .तर कौटुंबिक न्यायालय व कामगार न्यायालय येथे सुध्दा भिवंडी येथील हजारो दावे प्रलंबित असल्याने ती न्यायालये सुध्दा या न्यायालय इमारती मध्ये सुरू करण्याची गरज असल्याची मागणी ऍड चन्ने यांनी केली आहे. जनतेला सोयीस्कर व सुलभ न्याय मिळावा यासाठी न्यायालय सुरू करून त्यासाठी राज्याच्या अर्थमंत्रालयाकडून कर्मचारी वेतन व वेतनेतर खर्चासाठी आर्थिक तरतूद करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले .या आंदोलनास एमआयएम,राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय सेक्युलर,शिवसेना ठाकरे गट यांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी पाठिंबा दिला होता.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयbhiwandiभिवंडी