शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्थायी समितीचे अडले घोडे, सध्या आयुक्तांच्या बजेटनुसार कामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:46 IST

सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.

ठाणे : सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यामुळे आता यापुढील प्रस्ताव थेट महासभेतच मंजुरीसाठी जाणार आहेत. परंतु, त्या आधीच महत्त्वाची कामे खोळंबू नयेत म्हणून आयुक्तांच्याच बजेटमधून काही कामे केली जात असल्याची बाब समोर आली आहे.ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीची गणिते जुळविण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसची मदत घेतली होती. परंतु, ही मदत चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या इतर नगरसेवकांनी केला होता. यविरोधात विरोधक न्यायालयात गेले होते. त्यानंतर आता पक्षीय बलाबलानुसार सदस्यांची निवड व्हावी असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतांनाही शिवसेनेने पुन्हा काँग्रेसलाच हाताशी धरून पुन्हा चुकीच्या पद्धतीने निवड केली. त्यामुळे आता स्थायी समितीचे पुन्हा भिजत घोंगडे राहणार असल्याचे दिसत आहे. त्यात आता केवळ आर्थिक गणिते जुळावीत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निधी मिळावा म्हणूनच ही सत्ताधाऱ्यांना समिती गठीत करायची नसल्याचा आरोप राष्टÑवादीने केला होता. त्यामुळे स्थायीचे प्रस्ताव महासभेत नेऊन मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.एकूणच सत्ताधारी आणि विरोधकांमुळे स्थायीचे गणित पुन्हा कोलमडले आहे. त्यामुळे स्थायी समिती गठीत होत नाही, तो पर्यंत विकास कामे खोळंबू नयेत म्हणून आता पालिकेने आयुक्तांच्या बजेटनुसार कामे करण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, नालेसफाई अशी अत्यावश्यक कामे याच बजेटमधून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे लोकप्रतिनिधी किंवा सत्ताधारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.