शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

‘मराठा क्रांती मोर्चा’चा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:02 IST

जिल्ह्यातील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला

ठाणे : मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती बंद ठेवावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भरपावसात निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यातील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. शासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.शासकीय विश्रामगृहासमोर सकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरक्षण लागू करण्यास राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात जोरदार निदर्शने केली. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे, यासाठी आधीच १८ जुलैपासून परळीत ठोक आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शुक्रवारी येथील सकल मराठा समाजातर्फे ठोक आंदोलनास प्रारंभ केला आहे. आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाय... घेतल्याशिवाय राहणार नाय... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी येथील परिसर दणाणून सोडला. यानंतर या कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तातडीने आरक्षणाच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात होते. हे ठोक आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाचा दुसरा टप्पा असून कार्यकर्त्यांनी ते अभिनव पद्धतीने सुरू केले आहे. हक्काच्या आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी ५८ मूक मोर्चे काढूनही सरकार फक्त आश्वासन देत आहे. याप्रमाणेच आताही विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाभरतीमध्ये १६ टक्के जागा या मराठा समाजाला आरक्षित ठेवल्याचे आश्वासन दिले आहे. शैक्षणिक सवलती, हॉस्टेल, शिष्यवृत्ती, अ‍ॅट्रॉसिटी आदींबाबत सरकारने केलेल्या घोषणांची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. या आंदोलनात मराठा समाजातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाthaneठाणे