शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देता केली तोडण्याची कारवाई, रसवंतीगृह चालकाचा आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:51 IST

केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयाने येथील पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील कानिफनाथ रसवंती गृह बेकायदा असल्याचे कारण देत पाडण्याची कारवाई 30 जानेवारीला केली

डोंबिवली - केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयाने येथील पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील कानिफनाथ रसवंती गृह बेकायदा असल्याचे कारण देत पाडण्याची कारवाई 30 जानेवारीला केली. परंतू कोणतीही पूर्वसूचना न देता रसवंती गृह पाडण्यात आल्याचा आरोप चालक शंकर फडतरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त पी वेलरासू यांना पत्र पाठवून रसवंती गृहाचे दुकान पुर्ववत बांधून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आत्मदहन करू असा इशारा देत संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना कारवाई कशी केली? असा सवाल केला आहे. 

पश्चिमेकडील छन्नुर भवन इमारतीमधील गाळयात गेली 42 वर्षे रसवंती गृह चालवित होतो असा दावा फडतरे यांचा आहे. संबंधित दुकान मुळ जागा मालकाकडून पागडी पध्दतीने विकत घेतले होते. दरम्यान हे बांधकाम केडीएमसीने बेकायदेशीर ठरविल्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ती जून 2017 ला फेटाळली होती  परंतू या निर्णयाविरूद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबर 2017 ला याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील निर्णय प्रलंबित असताना केडीएमसीने दुकान तोडण्याची कारवाई न्यायालयाचा अवमान करणारी असल्याकडे फडतरे यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता आपले दुकान जमीनदोस्त केले हे बांधकाम तोडताना आपल्या कुटुंबातील कोणीही त्याठिकाणी उपस्थित नव्हते. घाईघाईत ही तोडण्याची कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या कोणत्या आदेशानुसार त्यांनी हे रसवंतीगृह जमीनदोस्त केले असा सवालही फडतरे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रत केला आहे. बांधकाम तोडण्यात जी तत्परता दाखविण्यात आली त्यामधून आर्थिक देवाण घेवाण झाली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. मला एक महिन्याच्या आत दुकान पुर्ववत करून दयावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर विष प्राशन अथवा आत्मदहन करण्यावाचून पर्याय नाही असा इशारा फडतरे यांनी आयुक्तांना दिला आहे. 

फडतरेंचे आरोप बिनबुडाचे उच्च न्यायालयाने फडतरे यांची याचिका फेटाळुन लावली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. माङयावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. नोटीस बजावूनच कारवाई करण्यात आल्याचे ह प्रभाग क्षेत्र अधिकारी अरूण वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.