शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

लढत २०१० : बहुमताअभावी केडीएमसीत त्रिशंकू अवस्था

By admin | Updated: October 13, 2015 01:52 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची एण्ट्री झाल्याने ही लढत युतीविरुद्ध आघाडी अन् मनसे अशी तिरंगी झाली.

प्रशांत माने, कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची एण्ट्री झाल्याने ही लढत युतीविरुद्ध आघाडी अन् मनसे अशी तिरंगी झाली. परंतु, कोणालाच बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. मात्र, सत्ता स्थापनेच्या वेळी मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने अपक्षांच्या बळावर शिवसेना-भाजपा सत्तारूढ झाले. तटस्थ भूमिका ही एक प्रकारे शिवसेना आणि मनसेमधील अंडरस्टँडिंग असल्याचे म्हटले गेले.या निवडणुकीतही शिवसेना-भाजपाची युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आघाडी करणे भाग पडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर यात उडी घेतल्याने निवडणूक तिरंगी आणि चुरशीची ठरली. यात शिवसेनेला ३१, भाजपाला अवघ्या ९, काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला १४, मनसेला २७ तर ११ अपक्ष निवडून आले होते. निवडणुकीत पहिल्यांदाच उतरणाऱ्या मनसेने अनपेक्षित यश मिळवून सर्वात जास्त मते मिळविली. मनसेमुळे शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, अशी शक्यता होती. परंतु, सेनेचे कमी तर सर्वाधिक नुकसान भाजपाचे झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही फटका बसला. या निकालानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हते. मात्र, मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे अप्रत्यक्ष का होईना त्यांच्या पाठिंब्यावर सेनेला केडीएमसीत सत्ता राखता आली. २७ जागा पटकाविणारी मनसे विरोधी पक्षात बसली. सेनेला अप्रत्यक्षपणे केलेल्या सहकार्याची पोचपावती म्हणून विरोधी पक्षात असलेल्या मनसेला पाच वर्षांत परिवहन आणि महिला व बालकल्याण समित्यांचे सभापतीपदही उपभोगायला मिळाले.