शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेसाठी अखेर शाळकरी विद्यार्थ्यांचा पुढाकार 

By धीरज परब | Updated: February 12, 2023 14:22 IST

माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे .

मीरारोड - माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे . पहिल्याच दिवशी ह्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदळवनातील कचरा उचलला असला तरी डेब्रिसची समस्या मोठी आहे . 

कांदळवन हे कायदे - नियम व न्यायालयांच्या आदेशा नुसार संरक्षित आहे . कांदळवनाचे महत्व दुर्लक्षित करून मीरारोडच्या सृष्टी ते पेणकरपाडा मार्गावरील जाफरी खाडी क्षेत्रातील कांदळवन मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा , डेब्रिसचा भराव केला जात असून त्यात काही बेकायदा बांधकामे देखील झाली आहेत .  येथे लहान मोठ्या टेम्पोतून नियमित डेब्रिस टाकले जाते . महापालिका बेकायदा घातक प्रदूषित सांडपाणी बेकायदा सोडत आहे . 

पर्यावरणाचा ऱ्हास व कचरा - डेब्रिसच्या भरावाने होणारी अस्वच्छता पाहून पेणकरपाडा मधील प्रेमा लक्ष्मण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच पालिका व राजकारणी यांच्यावर भरवसा न ठेवता स्वतःच कांदळवन मध्ये स्वच्छता मोहीम सुरु केली आहे . 

शनिवारी ८ वी व ९ वी च्या सुमारे १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी कांदळवन मधील कचरा उचलल्याची माहिती शाळेचे संचालक दीपेश गावंड यांनी दिली .  कांदळवन मध्ये टाकलेला बंदी असलेले प्लास्टिक व इतर  कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करून सफाई केली . मोहिमेत विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक , पर्यावरणासाठी कार्य करणारे स्थानिक तरुण रितेश पाटील आदी सहभागी झाल्याचे गावंड म्हणाले . 

पर्यावरणाचा रोज डोळ्या देखत होत असलेला ऱ्हास पाहून त्याच्या संरक्षणाची व स्वच्छतेची भावना जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे . मुळात पर्यावरण संरक्षण हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे अशी भावना विद्यार्थी व शिक्षकांनी बोलून दाखवली .

एरव्ही माझी वसुंधरा , स्वच्छता आणि सुशोभीकरणचा दिखावा करणारे माजी नगरसेवक , राजकारणी व पालिका प्रशासन  मात्र कांदळवनात टाकला जाणारा कचरा , डेब्रिस  कडे कमालीची डोळेझाक करत आहेत . प्रशासन व राजकारणी यांनी पर्यावरणाच्या संरक्षणा कडे दुर्लक्ष करणे हे शहर व नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक असल्याचे यावेळी रितेश पाटील यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरStudentविद्यार्थी