शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 07:09 IST

काही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला.

ठाणे : सुशसान, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुम्बकम् याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, परिवारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत, श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना मांडल्या आहेत. दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले. रामराज्य म्हणजे दहशतवादमुक्त राज्य असे सांगत त्यांनी रामराज्याची संकल्पना मांडली.

गावदेवी मैदान येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. २२ जानेवारीचा दिवस कारसेवकांकरिता आनंदाचा दिवस आहे. यानिमित्त नवीन भारताची निर्मिती मोदी करत आहे. गेल्या ९ वर्षांत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून २५ कोटींवर लोक गरिबी रेषेच्या वर आले. हा जगाच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. ज्यांच्या मनात, कामात राम त्यांच्या हातून हे घडते. रामराज्याची संकल्पना मांडत पंतप्रधान मोदी यांनी हे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. 

रामराज्य संकल्पनेवर देशाचा कारभारकाही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. हा निर्णय न्यायालयाचा आहे, असे म्हणत आहेत. परंतु त्यांनीच २००७ मध्ये सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात राम काल्पनिक असल्याचे म्हटले होते. मंदिर उभे राहू नये यासाठी त्यांनी व्यवस्था उभी केली होती. असे हे रामाला नाकारणारे  लोक आहेत, असा टोला विरोधकांना लगावत रामराज्याच्या संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरू आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला.

प्रभू श्रीरामांनी महिलांचा जसा सन्मान केला, त्याचप्रमाणे मोदीदेखील सातत्याने सांगत आहेत की, भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचे असेल तर भारतात ५० टक्के लोकसंख्या ज्या महिला आहेत यांना मानव संसाधनांमध्ये परिवर्तित केले पाहिजे. महिलांना ३३ टक्के लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा कायदाही मोदींनी केला. इनोव्हेशनमध्ये भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवले. आता सूर्याचेही मॅपिंग आपण करतोय, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ता सुजय पत्की, सृजन संपदा ट्रस्टच्या अध्यक्षा नयना सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस