शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसआरए योजना विस्ताराचा चेंडू नव्या मंत्रिमंडळाकडे, मंजुरीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:35 IST

मुंबई आणि ठाणे यांच्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा विस्तार फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, तत्कालीन शासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले होते.

ठाणे : मुंबई आणि ठाणे यांच्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा विस्तार फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, तत्कालीन शासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले होते. आता नव्या मंत्रिमंडळाच्या कोर्टात हा चेंडू आला आहे. या प्रक्रियेतील सर्व सोपस्कर पूर्ण झाले असून आता केवळ अंतिम मंजुरीसाठी म्हणजेच केवळ अध्यादेश काढणे शिल्लक आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार या क्षेत्रांत एसआरए अर्थात (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ या महानगर क्षेत्रांपर्यंत या योजनेचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.सध्या एसआरए ही योजना मुंबई आणि ठाण्यात सुरू आहे. ठाण्यात या योजनेचे स्वतंत्र कार्यालय २०१४ मध्ये सुरू केले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना या योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईला खेपा घालाव्या लागत नाहीत. झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा, यासाठी ठाणे आणि मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. दरम्यान, ठाणे शहरामध्ये ६० टक्के बेकायदा बांधकामे असून त्यामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे.त्यामुळे ठाण्यापर्यंत प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला होता. सध्या घोडबंदर भागातील ठाणे महापालिकेच्या भाजीमंडईच्या इमारतीत या योजनेचे कार्यालय सुरू आहे. ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनासंबंधीच्या प्रस्तावांना याच कार्यालयातून मंजुरी दिली जात आहे. परंतु, आता एमएमआरए रिजनमध्ये ती राबविण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले होते.उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबईला वगळलेसध्या मुंबई आणि ठाण्यात एसआरएसचे कार्यालय आहे. परंतु, आता या योजनेचा विस्तार एमएमआरए रिजनपर्यंत वाढणार असल्याने त्याचे मध्यवर्ती कार्यालय हे ठाणे हेच असणार आहे. त्यामुळे येथील कार्यालयासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. याच कार्यालयातून कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या भागातील झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भातील प्रस्तावांना मंजुरी मिळणार आहे.परंतु, या योजनेतून उल्हासनगर आणि पनवेल ही शहरे वगळली जाणार आहेत. उल्हासनगर भागात कॅम्प पद्धतीने इमारती असून याठिकाणी झोपडपट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या पनवेल हे शहर लांब अंतरावर आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे वगळण्यात येणार आहेत.उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्षआधीच्या सरकारच्या काळात या प्रस्तावासंदर्भातील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याची माहिती एसआरएच्या सूत्रांनी दिली. केवळ आता अंतिम मंजुरी म्हणजेच अध्यादेश काढणे शिल्लक असून तसे झाल्यास खऱ्या अर्थाने एसआरएचा विस्तार एमएमआरए रिजनमध्ये होण्यास मदत होणार आहे. आता नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हा अध्यादेश काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार