पालघरमध्ये ८२ ठिकाणी पथकाने पकडली वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:30 AM2020-10-10T01:30:05+5:302020-10-10T01:30:14+5:30

महावितरणची धडक मोहीम; जिल्ह्यातील वीजचोरांवर कारवाई सुरू

Squad caught power theft at 82 places in Palghar | पालघरमध्ये ८२ ठिकाणी पथकाने पकडली वीजचोरी

पालघरमध्ये ८२ ठिकाणी पथकाने पकडली वीजचोरी

Next

पालघर : महावितरणच्या पालघर विभागाने वीजचोरीविरुद्ध उभारलेल्या धडक मोहिमेत ८२ जणांकडील वीजचोरी उघडकीस आणली आहे. या पथकाने जवळपास सव्वादहा लाख रुपयांच्या ६६ हजार युनिट वीजचोरीप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे, असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालघर विभाग कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर ग्रामीण व एमआयडीसी, डहाणू, जव्हार, सफाळे, तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड उपविभागातील ६११ वीजजोडण्यांची आतापर्र्यंत तपासणी करण्यात आली. यात ७८ ठिकाणी वीजचोरी तर ४ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय ११ ग्राहकांच्या मीटर रीडिंगची अचूक नोंद त्यांच्या वीजबिलात झाली नसल्याचे निदर्शनास आले. ६६ हजार युनिट वीजचोरी प्रकरणी संबंधित ७८ जणांविरुद्ध विद्युत कायदा-२००३ च्या कलम १३५ नुसार, तर चार जणांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीसंदर्भात जवळपास १० लाख १७ हजार रुपयांची वीजबिले भरण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात येत असून या वीजबिलाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल, असे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले.

वीजचोरीला प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असून मोहिमेत वीज, वीजमीटर्समधील छेडछाड शोधून अचूकपणे वीजचोरी पकडण्यासाठी अ‍ॅक्यूचेक मीटरचा वापर करण्यात येत आहे.

ही मोहीम नियमित सुरू राहणार असून कटू कारवाई टाळण्यासाठी अधिकृत जोडणी घेऊनच वीजवापर करावा व मोहिमेत सहभागी कर्मचाºयांना सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

मोहिमेमध्ये सहभागी पथक
मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल व पालघर विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये व डहाणू, पालघर, जव्हार, बोईसर, सफाळे, तलासरी, मोखाडा, विक्रमगड उपविभागीय कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंत्यांसह स्थानिक अभियंते, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.

611 वीजजोडण्यांची आतापर्र्यंत तपासणी करण्यात आली.
82 जणांविरुद्ध कलम
१३५ / १२६ नुसार कारवाई
वीजचोरीसंदर्भात जवळपास १० लाख १७ हजार रुपयांची वीजबिले भरण्याची नोटीस.
वीजचोरी पकडण्यासाठी अ‍ॅक्यूचेक मीटरचा वापर.

Web Title: Squad caught power theft at 82 places in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज