शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डंपिंग ग्राउंडवर परफ्यूमची फवारणी; पंतप्रधान मोदींमुळे आधारवाडीचे 'कल्याण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 12:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळानं कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेनं रस्त्यावरील सर्व गतिरोधक हटवले आहेत. केडीएमसीनं आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरही परफ्यूमचे फवारे मारले आहेत.

कल्याण- पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेनं रस्त्यावरील सर्व गतिरोधक हटवले आहेत. कल्याण-भिवंडी बायपासवरील वाहनांच्या धुरानं काळेकुट्ट झालेले दुभाजक महापालिकेनं टँकरच्या पाण्यानं धुऊन स्वच्छ केले आहेत. विशेष म्हणजे केडीएमसीनं आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरही परफ्यूमचे फवारे मारले आहेत. जेणेकरून आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमधून मोदींच्या दौऱ्यादरम्यान दुर्गंधी सुटू नये.तसेच आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर 16 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो रेल्वेमार्गासह पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी कल्याणमधील फडके रोडवर येणार आहेत. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडही फडके रोडच्या विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळे केडीएमसीनं या डंपिंग ग्राऊंडवर सुगंधाचे फवारे मारले आहेत. मोठी गर्दी झाल्यास ती सांभाळण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणेपुढे राहणार आहे.निषेध करणारे नजरकैदेत..कल्याणमध्ये मेट्रोच्या भूमिपूजनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, मात्र कल्याणमधील काँग्रेसचे पदाधिकारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती उतरू नये आणि या कार्यक्रमाला कुठल्या प्रकारची बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी अशा वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :dumpingकचरा