शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या गाव चलो अभियानास उस्फुर्त प्रतिसाद; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By नितीन पंडित | Updated: February 8, 2024 19:36 IST

कोकण विभागात एकूण सहा लोकसभा मतदार संघात पक्षाच्या १४ संघटनात्मक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात असून आता पर्यंत त्यास नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे

भिवंडी :लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चे बांधणी करण्यात सुरुवात केली असून ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या गाव चलो अभियान या उपक्रमात प्रवासी कार्यकर्ते प्रत्येक बूथ मधील नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यास उस्फुर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याची माहिती गाव चलो अभियान प्रदेश संयोजन समितीचे सहसंयोजक हरिश्चंद्र भोईर यांनी गुरुवारी भिवंडीत दिली आहे.

राज्यातील सर्व खेडोपाडी व शहरातील सर्व बूथ यामध्ये हे प्रवासी कार्यकर्ते एक दिवस २४ तास त्या गावात राहून स्थानिक नागरिक,युवक,महिला,शेतकरी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय सेवेतील कुटुंबीय,माजी सैनिक,आशा अंगणवाडी सेविका ,लाभार्थी व नवमतदार यांच्याशी संवाद साधणार आहेत. यामध्ये नागरिकांकडून योजना राबविताना येणाऱ्या अडचणी समजून घेत सूचना सुध्दा  स्वीकारणार असून त्याचा उपयोग निवडणूक जाहीरनामा बनवताना होणारा आहे अशी माहिती हरिश्चंद्र भोईर यांनी दिली.  कोकण विभागात एकूण सहा लोकसभा मतदार संघात पक्षाच्या १४ संघटनात्मक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात असून आता पर्यंत त्यास नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रवासी कार्यकर्ते यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील कार्यकर्ते ग्रामीण भागात काम करतील तर लोकसभा निवडणुका पूर्ण होई पर्यंत दर पंधरा दिवसांनी हे प्रवासी कार्यकर्ते नेमुन दिलेल्या गावांना भेटी देतील अशी माहिती हरिश्चंद्र भोईर यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील कोनगावात राबविणार अभियान

गाव चलो अभियान अंतर्गत सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी सर्वसामान्य प्रवासी कार्यकर्ते म्हणून आपले योगदान देणार आहेत.यामध्ये केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे रविवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्या पासून कोनगाव या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ते म्हणून अभियानात सहभागी होणार आहेत अशी माहिती देखील संयोजक हरिश्चंद्र भोईर यांनी दिली आहे.