शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बाळकूम, कोलशेत,ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:46 IST

वाढत्या रुग्णसंख्येनंतर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा निर्णय 

ठाणे : ठाण्यात अनलॉकनंतर गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आता माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या कोलशेत ,ढोकळी आणि बाळकूम परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच या भागात ७ दिवस उत्सुर्तपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला असून यामध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली जाणार असून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करणारे ठाण्यातील हे पहिले परिसर आहेत. 

  ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून अनलॉकनंतर तर यामध्ये आणखी भर पडली आहे. रुग्णावढीचा वेग देखील वाढला असून दररोज १५० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. रविवारी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून संपूर्ण ठाणे शहरात २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक ६४ नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याने इथल्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नागरसेवक संजय भोईर यांनी बाळकूम, कोलशेत आणि ढोकाळी परिसरातील काही सोसायटी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाची बैठक घेतली असून या बैठकीमध्ये स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आजपासून पुढील सात दिवस हा लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. 

         या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा,मेडिकल,हॉस्पिटल्स,रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय  (सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत )वगळून सर्व प्रकारचे किराणा स्टोअर्स,भाजीपाला,मच्छी विक्रेते, मटण चिकन विक्रेते सात दिवस बंद राहणार आहे. कोरोना हटाव बाळकूम, कोलशेत,ढोकाळी बचाव अशा आशयाच्या पोस्ट देखील या परिसरात सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत. 

" अनलॉक नंतरच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिसरात २५० पेक्षा अधिक सोसायटी असून तेवढाच ५० टक्के भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले, सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यामुळे संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी हा सात दिवसांचा लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना देखील लॉकडाऊन हवा होता . तरच ही साखळी तुटण्याची शक्यता आहे.                                                                                                    - संजय भोईर, नगरसेवक , ठा.म.पा 

"काही दिवस अनलॉक करून पुन्हा लॉकडाऊन करणे आवश्यक होते. मात्र तसे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नाही. परिणामी रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे प्रशासनाची वाट न बघता आपल्या सुरक्षितेसाठी स्वतःहुन लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती.                                                                                                  - ओमप्रकाश पाटील, रहिवासी, बाळकूम

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस