शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-तळोजा मेट्रोला गती, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2023 09:30 IST

या प्रकल्पाचा एकूण खर्च ५,८६५ कोटी इतका आहे.  २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. ७ फेब्रुवारी रोजी निविदा उघडल्या जाणार आहे.

नवी मुंबई : कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या चार महानगरांच्या विकासात मैलाचा दगड  ठरू पाहणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या मार्गांचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या मार्गातील सर्व १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त  सापडला आहे. हा संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५,८६५ कोटी इतका आहे.  २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. ७ फेब्रुवारी रोजी निविदा उघडल्या जाणार आहे.

या स्थानकांचा समावेशया मार्गात १७ उन्नत स्थानके असतील. यात गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे.निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत असेल, तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार आहे.

तीन मेट्रो एकमेकांस जोडणारठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजुरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण मेट्रो ही मेट्रो कल्याण येथेच जोडली जाईल. निळजेजवळ ती कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार आहे.

२६८.५३ कोटींचा सल्लागारगायमुख ते मीरा रोड, कल्याण ते तळोजासाठी सिस्ट्रा एस.ए. आणि डी.बी. इंजिनीअरिंग आणि कन्सल्टिंग यांच्या निविदा मंजूर केल्या. २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये खर्च होणार आहे.

शीळफाटा-तळोजा-पनेवलला फायदाकल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर होत असून शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह खासगी टाउनशिप आकार घेत आहेत. याच भागात बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे.

पिसावेत डेपोमेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे असेल. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपो म्हटले की, कारशेडही आली. यामुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो