'Speed transfer process for extended Thane railway station' | 'विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकासाठी जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळावी'
'विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकासाठी जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळावी'

ठाणे : ठाणे शहराची लोकसंख्या मागील दोन दशकांमध्ये प्रचंड वाढल्यामुळे दररोज रेल्वेतून पडून प्रवासी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकात घडतात. तसेच, रेल्वे प्रवाशांना पुरेशा सोयीसुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरु ग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा महापालिकेस हस्तांतरित करण्याच्या प्रक्रि येला गती मिळावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी रात्री राजभवनावर भेट घेतली.

ऐतिहासिक रेल्वेस्टेशनला १६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या रेल्वेस्थानकातून दररोज सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. ठाणे-मुलुंडदरम्यान दिवसाला चार ते पाच प्रवासी गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. मध्य रेल्वेवर दिवसाला १२ जण मृत्युमुखी पडतात. गेल्या पाच वर्षांत अंदाजे तीन हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामध्ये ठाणे-मुलुंडदरम्यान प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधिक असल्याने ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी ठामपाने रेल्वेरु ळांलगत असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरु ग्णालयाच्या ६३ एकर जागेपैकी १४.८३ एकर जागा ठामपास सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हस्तांतरित करण्यास विलंब लागत असल्याने यासंदर्भात मुख्य सचिवांमार्फत ही जागा लवकर हस्तांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांशी चर्चा करताना खासदारांनी सांगितले की, या प्रस्तावाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडून २०१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. नवीन रेल्वेस्थानकासाठी मनोरु ग्णालयाची जागा मिळविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २८९ कोटी रुपये ठामपाच्या स्मार्ट सिटीकडे वर्गही करण्यात आले आहेत. ठामपाने निविदा काढून या स्थानकाच्या भूमी परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. परंतु जागा हस्तांतरण प्रक्रि येस विलंब लागत असल्याने रेल्वेरु ळांच्या कामासाठी रेल्वेकडे पैसे वर्ग करता येत नाहीत, याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

एल्फिन्स्टन रोडवरील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती ठाणे स्थानकात होऊ नये, यासाठी संपूर्ण ठाणेकर या नवीन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. हे स्थानक निर्माण झाल्यावर ठाणे रेल्वेस्थानकातील ३१ टक्के व मुलुंड रेल्वेस्थानकातील २४ टक्के प्रवाशांचा भार कमी होईल, असे खासदारांनी सांगितले.

Web Title: 'Speed transfer process for extended Thane railway station'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.