नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महापालिकेच्या जलतरण तलावात १० फेब्रुवारी २०१९ रोजी फर्मान परवेज खान (१९) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर, येथे सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. स्व.परशुराम धोंडू टावरे स्टेडियमच्या बाजूला असलेल्या तरण तलावात मुले पोहण्याचे धडे घेत आहेत. महापालिकेने ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी स्पोर्टिव्ह फिटनेस सेंटर या कंपनीला २०११ मध्ये ३ लाख रुपये वार्षिक भाडे करारावर तलाव दिला आहे.
भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
दरवर्षी ठेकेदाराच्या भाड्यात दहा टक्क्यांची वाढ करण्यात येते. २५ मीटर लांब आणि १५ मीटर रुंद तलावात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना पोहण्याची सुविधा आहे. लहान मुलांना पोहण्यासाठी ३ फूट खोल पाणी असून, मोठ्या व पोहता येणाऱ्या व्यक्तींसाठी ७ फुटांची खोली ठेवण्यात आली आहे. तीन ते चार प्रशिक्षक येथे आहेत. मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षक तत्पर असतात. एका व्यक्तीकडून दरमहा ३ हजार, तीन महिन्यांसाठी ५ हजार आणि वर्षाला ७ हजार फी आकारली जाते. त्यात दररोज दोन तास प्रशिक्षण दिले जाते. हौशी मुलांकडून ४५ मिनिटांसाठी १०० रुपये घेण्यात येतात.
Web Summary : Following a drowning in 2019, Bhiwandi swimming pool emphasizes safety. Leased to Sportive Fitness Center, the pool offers training for all ages with instructors. Fees range from ₹3,000 monthly to ₹7,000 annually, including training. Rent increases by 10% yearly.
Web Summary : 2019 में डूबने की घटना के बाद, भिवंडी स्विमिंग पूल में सुरक्षा बढ़ाई गई। स्पोर्टिव फिटनेस सेंटर को पट्टे पर दिया गया, यह पूल प्रशिक्षकों के साथ सभी उम्र के लिए प्रशिक्षण प्रदान करता है। शुल्क ₹3,000 मासिक से ₹7,000 वार्षिक तक है, जिसमें प्रशिक्षण शामिल है। किराया हर साल 10% बढ़ता है।