Special children's specials: 'The King Joe Ray ...' by the special children presented by Swapnavat Natya Vishnu. | विशेष मुलांची विशेष धम्माल : विशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कार 'राजा जो जो रे ... '* 
विशेष मुलांची विशेष धम्माल : विशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कार 'राजा जो जो रे ... '* 

ठळक मुद्देविशेष मुलांची विशेष धम्मालविशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कारदिव्यांग कलाकेंद्राचा प्रवासातील दुसरा टप्पा सादर

ठाणेठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग व आदित्य प्रतिष्ठान ठाणे संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपूर्वी सुरू झलेल्या  दिव्यांग कलाकेंद्राचा प्रवासातील दुसरा टप्पा दिव्यांग कलाकेंद्राने आगळ्यावेगळ्या सादरीकरणाने अभिनय कट्ट्यावर साजरा केला .दिव्यांग मुलांना सहानभूती नव्हे तर त्यांच्यातील कमीपणापेक्षा त्यांच्यातील लपलेल्या गुणांना त्यांची खरी ओळख बनवण्याच्या हेतूनेच दिव्यांग कला केंद्राची सुरुवात झाली. आणि ह्या दोन वर्षात मुलांची शारीरिक मानसिक  दोन्ही क्षेत्रातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे.कुणी चांगलं चित्र काढू लागलाय.. कुणी चांगलं गाऊ लागलाय.. कुणी खेळात प्रवीण झालाय... कुणी पोहण्यात... कुणी नाचतो... कुणाचं पाठांतर चोख .देवाने दिलेल्या विशेष गुणांना  व्यासपीठ मिळवून देणार दिव्यांग कला केंद्र.दोन वर्षात मुलांनी केलेले नृत्याविष्कार, नाट्याविष्कार, खेळातील प्राविण्य ठाणेकरांची कौतुकाचा विषय होता.दहीहंडी उत्सव,गणेशोत्सव , नवरात्रोत्सवातली कार्यक्रमासोबत ट्राफिक नियमावर भाष्य करणार 'बाबू समजो इशारे' देशातील ऐक्यावर भाष्य करणार हम सब एक है अशा अनेक सादरीकरणांची ठाणेकरांसोबत ठाण्यातील वरिष्ठ राजकीय आणि सामाजिक अधिकाऱ्यांनी दिव्यांग कला केंद्राची कौतुक करीत दखल घेतली. 

  दोन वर्षाच्या प्रवासात मुलांमधील बदलाचा स्नेहसंमेलनानिमित्त सादर करण्यात आलेला नाट्याविष्कार म्हणजे  'राजा जो जो रे' हा एक भन्नाट पुरावा आहे.निवेदन पासून ते नाटकाच्या शेवटपर्यंत दिव्यांग मुलांनी सादर नाटक सामान्य कलाकारांच्या ताकदीने सादर करून दाखविले.अचूक संवादफेक पात्राला साजेशी वेशभूषा, रंगभूषा , मुलांनीच बनवलेलं नेपथ्य  आणि मुलांमधील निरागसत्व हे ह्या बालनाट्याच वैशिष्ठय. कोणत्याही दिव्यांग मुलांनी इतकं अप्रतिम सादरीकरण केलेलं हे पहिलंच नाटक असावं.सदर नाटकाला *दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती ह्यांचं दिग्दर्शन लाभलं. सादर नाटकाला संगीत कादिर शेख, परेश दळवी ह्यांनी दिले* .आणि मुलांची रंगभूषा रंगभूषाकार मनोज ह्यांनी केली. आळशी राजाची झोप हरवलेली आहे आणि ती शोधून देण्याचा खटाटोप सादर नाटकात मांडला आहे. *लेखक र. म. शेजवलकर*  ह्यांच्या लेखणीतून अवतरलेले ह्या बालनाट्याचे एक विशेष सादरीकरण दिव्यांग कला केंद्राच्या कलाकारांनी सादर केले.सदर नाटकात *राजाची भूमिका अपूर्वा दुर्गुळे ,राणीची भूमिका आरती गोडबोले, सेनापतीची भूमिका अन्मय मेत्री,प्रधानजींची भूमिका विजय जोशी,दवंडीवाल्याची भूमिका गौरव राणे, सुरीलाची भूमिका अविनाश मुंगसे, आजीची भूमिका ऋतुजा गांधी , नर्तकांची भूमिका पार्थ खड्कबाण ,भूषण गुप्ते, रेश्मा जेठरा ,गौरव जोशी ह्यांनी तर जादूगाराची भूमिका संकेत भोसले आणि जान्हवी कदम ,अंगाईगाणारी  भूमिका दीपा काजळे आणि तिच्या नातीची भूमिका रुपाली विभुते ,साधूची भूमिका निशांत गोखले ह्यांनी साकारली* . मुलांच्या सादरीकरणाने उपस्थित मुलांच्या पालकांसोबतच उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले.  राजा जो जो रे नाटक लिहून पस्तीस वर्ष झाली अनके कलाकारांनी ह्याचे आजवर अनेक प्रयोग सादर केले. पण आज दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी सादर केलेला प्रयोग हा माझ्या आयुष्यातील ह्या संहितेचा एक अभूतपूर्व प्रयोग होता असे मत बालनाट्याचे लेखक डॉ. र. म. शेजवलकर ह्यांनी व्यक्त केले.

        कार्यक्रमाच्या शेवटी २०१८-१९ ह्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व मुलांचा सत्कार करण्यात आला . ह्या वर्षभरात *मुलांनी वृक्षारोपण करून रोपवाटिकेची लागवड केली, दिव्यांग रोपवाटिकेला सुरुवात करण्यात आली. हसतखेळत व्यवहार ज्ञानासोबत विविध कार्यक्रमात नृत्याविष्कार ,नाट्याविष्कार केले,त्यांनी काढलेल्या चित्रांची, शुभेच्छा पत्रांची , दिव्यांग बंधनातून त्यांनी समजवलेल राखीचे महत्व पटवून देणारे सादरीकरण केले* .वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सादर कार्यक्रमात आले. खेळ महोत्सव २०१८-१९ मध्ये दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी बटाटा शर्यत,संगीत खुर्ची,चमचा लिंबू आणि धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. सदर कार्यक्रमात काही विशेष पारितोषिक देऊन मुलांना प्रोत्साहित करण्यात आले. *भूषण गुप्ते, रेश्मा जेठरा,रुपाली विभुते ह्यांना सुंदर हास्य* ; *आरती गोडबोले,जान्हवी कदम ह्यांना सुंदर नर्तक* ; *विजय जोशी,ऋतुजा गांधी ह्यांना सुंदर गायक* , *दीपा काजळे, गौरव जोशी ह्यांना गुणी विद्यार्थी;* *गौरव राणे ह्याला उत्कृष्ट विध्यार्थी* , *अन्मय  मेत्री ह्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू,* *निशांत गोखले ह्याला कलात्मक विद्यार्थी* , *अविनाश मुंगसे ह्याला सर्वोत्कृष्ट कलाकार* , *पार्थ खडकबाण ह्याला आकर्षक व्यक्तिमत्व*  *संकेत भोसले,अपूर्वा दुर्गुळे* ह्यांना २०१८-१९ मधील *आदर्श विद्यार्थ्यांचे*  पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्राचे शिलेदार  अनिता महाजन ,संगीत शिक्षक वीणा टिळक ,कला शिक्षक परेश दळवी आणि व्यवस्थापक संभाजी आंद्रे ह्यांचाही वर्षभरातील कामगिरी बद्द्दल सन्मान करण्यात आला. 

       दिव्यांग कला केंद्राचा दोन वर्षाचा प्रवास माणूस म्हणून आम्हाला खूप काही शिकवून गेला. मुलांसोबत आमचे नाते घरच्यांसारखेच जवळचे निर्माण झाले. आमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणूनच आम्ही दिव्यांग कला केंद्र अनुभवतो. दोन वर्षातील मुलांमधील बदल हा खूप आशादायक आहे. येणाऱ्या पुढील वर्षात दिव्यांग कला केंद्रात मुलांच्या प्रगतीसाठी अजून खूप गोष्टी ठरवलेल्या आहे. समाजातील  विविध क्षेत्रातील नागरिकांनी  सहकार्य करावे असे मदतीचे आवाहन व आपल्या मुलांच्या सुंदर भविष्यासाठी आपण मिळून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे असे पालकांना आवाहन  दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती यांनी केले. दोन वर्षात दिव्यांग कला केंद्राच्या माझ्या मुलांमधील प्रगती खूपच समाधान कारक आहे.ह्या दोन वर्षात सामान्य माणसालाही लाजवेल असे सादरीकरण ह्या विशेष मुलांनी सादर केलेत.आज सादर केलेले राज जो जो रे नाटक कुठेही जाणवले नाही कि हे दिव्यांग मुलांनी सादर केले.* *मुलांना जे आवडतं ते त्यांना करून द्यायचं त्या क्षेत्रात त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळवून देऊन भविष्यात  त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचं ध्येय दिव्यांग कला केंद्राचं आहे.* मुलांमधील जिद्द ,ऊर्जा आपल्यालाही शिकवून जाते कि संकटं व अडचणी ह्या टाळण्यासाठी नाही तर जगण्याची नवीन उमेद निर्माण करण्यासाठी असतात *भविष्यात दिव्यांग मुलांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभं करण्यासाठी दिव्यांग कला केंद्र कटिबद्ध आहे असे मत अभिनय कट्टा,दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. 

      दिव्यांग कला केंद्र म्हणजे आमच्या मुलांचे दुसरे घर. आमच्या मुलांमधील खऱ्या गुणांना ओळखून पारखून त्यांची गुणवत्ता वाढवायचा प्रामाणिक प्रयत्न गेली दोन वर्षे दिव्यांग कला केंद्र करतेय. आमच्या मुलांमधील दोन वर्षातील बदल खरंच आम्हालाही आनंद देऊन जाणारे आहेत.अशा प्रकारची मुलांच्या चेहऱ्यावर सतत हसू ,आनंद, समाधान देणारी शाळा आम्ही आजपर्यंत पाहिली नाही. दिव्यांग कला केंद्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असे मत दिव्यांग कलाकेंद्रातील विध्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले.


Web Title: Special children's specials: 'The King Joe Ray ...' by the special children presented by Swapnavat Natya Vishnu.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.