शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

साडेपाच हजार गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीसाठी ५५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 2:03 AM

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा पुढाकार : सर्वसाधारण सभेची मंजुरी

सुरेश लोखंडे 

ठाणे : आर्थिक समस्येमुळे ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी टेस्ट करणे शक्य होत नाही. यामुळे सुयोग्य उपचाराअभावी महिलेसह नवजात बालकाच्या जीवितास धोका संभवतो. तो टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील पाच हजार ५०० महिलांना सोनोग्राफीच्या बिलाची रक्कम व प्रवासभाडे देण्यासाठी तब्बल ५५ लाख रुपयांची तरतूद केली असून तिला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात जिल्हा परिषदेची ६४ प्राथमिक आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. त्यामध्ये वर्षभरात २६ हजार गरोदर मातांची नोंदणी होत आहे. पण, या महिलांच्या सोनोग्राफीसाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी होत नाही. खाजगी रुग्णालयात ती करण्यासाठी आर्थिक समस्येमुळे महिला या तपासणीस मुकत आहेत. या गरजेच्या तपासणीकडे लक्ष केंद्रित करून जिल्हाभरातील सुमारे पाच हजार ५०० महिलांसाठी ५५ लाखांची तरतूद जिल्हा परिषदेने केली.या सोनोग्राफी तपासणीमुळे जिल्ह्यातील या जोखमीच्या गर्भवती माता, जन्मत: व्यंग, जुळी मुले, बाळाची वाढ इत्यादी बाबींचे वेळीच निदान होणे शक्य आहे. या महिलांच्या परिसरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार किमान एक सोनोग्राफी तपासणी करण्याची अपेक्षा आहे. यासाठी २०१९-२० या कालावधीत सोनोग्राफी तपासणीसाठी लागणाºया ८०० रुपयांच्या खर्चासह या सोनोग्राफी केंद्रावर जाण्यासाठी २०० रुपये गाडीभाडे देण्याची जि.प.ने तरतूद केली आहे. त्यास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे या गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे.अशी आहे तालुकानिहाय मंजुरी : जिल्ह्यातील या पाच हजार ५०० महिलांसाठी सोनोग्राफी तपासणीकरिता ८०० प्रमाणे सुमारे ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. याशिवाय, सोनोग्राफी सेंटरवर जाण्यासाठी लागणाºया २०० रुपये प्रवासखर्चानुसार ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यानुसार, ५५ लाख रुपये या महिलांच्या सोनोग्राफी तपासणीवर खर्च केला जाणार आहे.या लाभासाठी शहापूर तालुक्यातील एक हजार ८०० महिलांकरिता १८ लाख रुपयांची तरतूद आहे. तर, अंबरनाथच्या पाच महिलांकरिता पाच लाख, कल्याणच्या ५०० महिलांसाठीदेखील पाच लाख, भिवंडी तालुक्यातील एक हजार ५०० महिलांकरिता १५ लाख आणि मुरबाड तालुक्यातील एक हजार २०० गर्भवती महिलांसाठी १२ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदWomenमहिला