शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गाणी, डान्स, एकपात्रीतून आजीआजोबांनी उडवली धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:06 AM

ठाण्यात रंगली जवानी-दिवानी स्पर्धा : २०० स्पर्धकांचा सहभाग, ९२ वर्षांच्या आजोबांनी सादर केलेली गाणी ठरली हिट

ठाणे : ५८ वयापासून ९२ वर्षांपर्यंतच्या आजीआजोबांनी गाणी गात, डान्स, एकपात्री सादर करून एकच धम्माल उडवून दिली. सैगल, पंकज मलिक यांच्या गाण्यांपासून ते अगदी तम्मा तम्मा, बत्तमीज दिल, यापर्यंतची सगळी गाणी सादर केली. ९२ वर्षांच्या डी. बी. भाटिया यांनी ‘एक राज का बेटा लेकर’, ‘आयी बहार...’ ही दोन गाणी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांची भरभरून दाद दिली.इनरव्हील क्लब आॅफ ठाणे, ठाणे नॉर्थ एण्ड, ठाणे गार्डन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ५८ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी जवानी-दिवानी स्पर्धा आयोजित केली होती.यावेळी गाणे, नृत्य, एकपात्री अभिनय, वेशभूषा, चित्रकला, निबंध, बेस्ट आजीआजोबा स्पर्धा घेण्यात आल्या. यात जिल्ह्यातील दोनशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. सुरुवातीला सोलो आणि ग्रुप सिंगिंग स्पर्धा पार पडली. यात जवळपास सत्तरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेऊन जुनीनवीन, हिंदीमराठी गाणी सादर केली. ५९ वर्षांचे दृष्टिहीन असलेले प्रदीप म्हाळगी यांनी ‘दुनिया रंगरंगिली’ हे गाणे सादर केले. मी संगीताचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. परंतु, गाणी ऐकून शिकलो. पहिल्यांदाच अशा स्पर्धेत सहभागी झाल्याचे ते म्हणाले. यावेळी लावण्याही सादर झाल्या. नृत्य स्पर्धेत तर आजीआजोबांनी धम्माल उडवली. होठों पे ऐसी बात, लुंगी डान्स या गाण्यांवर डान्स केला. विशेष म्हणजे हावभावानेच प्रेक्षकांची मने जिंकली. वेशभूषा स्पर्धेत ज्येष्ठांनी उत्साहाने भाग घेतला होता. ६७ वर्षांच्या सुहासिनी भालेराव यांनी सावित्रीबाई फुले यांची, ७२ वर्षीय माधव धामणकर यांनी किंसिंग कपल अशी वेशभूषा तसेच कोयना भूकंपावर आधारित एकपात्री प्रयोग करून त्यात मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची भूमिका, ६० वर्षांच्या अनुराधा मेहेंदळे यांनी पुतळाबाई, तर ६३ वर्षांच्या सीमा अग्रवाल यांनी मदर तेरेसांची वेशभूषा साकारली. प्रत्येक स्पर्धेतून पाच जण निवडले जाणार असून या स्पर्धेची अंतिम फेरी पुढच्या शनिवारी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे, असे समन्वयक आरती कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी ठाणे नॉर्थ एण्डच्या अध्यक्षा मनीषा कोंडसकर, शोभा नायर, ठाणे गार्डन सिटीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा गुप्ते, ‘इनरव्हील’च्या अध्यक्षा अमला परदेशी, समन्वयक अश्विनी गोखले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणे