शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मद्यधुंद अवस्थेतील पोलिस पुत्राने केली आत्महत्या

By admin | Updated: January 27, 2017 21:33 IST

मद्यधुंद अवस्थेतील पोलिस पुत्राने पोलिसांनी चौकशी केल्यावरुन झालेल्या वादात थेट खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याच्या भार्इंदर मधील घटनेचा नवघर पोलिस तपास करत आहेत

ऑनलाइन लोकमत

मीरारोड, दि.27 - मद्यधुंद अवस्थेतील पोलिस पुत्राने पोलिसांनी चौकशी केल्यावरुन झालेल्या वादात थेट खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याच्या भार्इंदर मधील घटनेचा नवघर पोलिस तपास करत आहेत. तर त्याला वाचण्यास गेलेल्या मित्राला मात्र पोलिसांनी बुडण्या पासुन वाचवले असले तरी मृत्युपुर्वी त्या मुलाने पोलिसांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची व्हॉईस रॅकॉर्डिंगची क्लीप व्हारयल झाल्याने नवघर पोलिस संशयाच्या भोवरयात सापडले आहेत. विशेष राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी सुरवातीला तपास चालवला होता. पण आता त्यांनी स्थानिक पोलिसांनाच तपास करण्यास कळवल्याचे समजते.

भार्इंदर पुर्वेच्या बंदरवाडी भागात सीव्हयु इमारतीत राहणारा विक्रांत उर्फ विकी भांडे (२१) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडिल मुंबई पोलिसांच्या गोराई पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षक आहेत. विकीचा मोठा भाऊ रोहित याचा मित्र लॉईड कास्ट्रो हा सिंगापुरला पुन्हा जाणार होता. त्या निमीत्ताने बुधवारच्या रात्री विकी, रोहित, लॉईड, वैभव जाधव आदि मित्र जेसल पार्क येथील खाडि किनारी बसले होते. पार्टी म्हणुन विकी सह काहींनी मद्यपान केले. रोहित हा आधीच घरी निघुन गेला. तर गप्पा मारत गुरुवारच्या पहाटेचे २ वाजुन गेले.

विकी हा लॉईडच्या घराजवळच दुचाकी घेऊन बोलत असताना पोलिसांचे गस्त घालणारे वाहन आले. त्यात महिला पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील ह्या होत्या. मद्यपान केलेल्या विकीकडे त्यांनी लायसन, कागदपत्रे मागीतली असता ती त्याने दाखवली. परंतु विकी हा मद्यधूंद अवस्थेत बडबड करु लागल्याने पोलिसांनी त्याला गाडीत बसवले व लॉईडला दुचाकी घेऊन चौकीत येण्यास सांगीतले.

लॉईड हा आला नाही पण विकीचा दुसरा मित्र वैभव जाधव तेथे आला. विकीला सोडुन देत पाटील ह्या निघुन गेल्या. परंतु त्या नंतर देखील विकीहा पोलिसांना अर्वाच्च बडबड करत होता. पोलिसांनी त्याला कशाला बडबडतो म्हणुन सांगीतले. वैभव देखील त्याला जाऊदे म्हणाला. पण विकी हा पायातल्या चप्पल काढुन तडक खाडीत शिरला. त्याच्या पाठी वैभव धावला. विकी ओहोटीच्या पाण्यात बुडाला तर गटांगळ्या खाणारया वैभवला मागुन धावत आलेले पोलिस काळुराम काळडोके यांनी वाचवले. पोलिसांनी अग्नीशमन दलाला कळवल्या नंतर जवान घटनास्थळी आले. त्यांनी खाडीत शोध घेऊन विकीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला अशी माहिती नवघर पोलिस व त्याच्या मित्रााने दिली आहे.

या घटने प्रकरणी नवघर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असली तरी विकीच्या मोबाईल मध्ये मृत्यु पुर्वी त्याचा व्हॉईस मेसेज रॅकॉर्ड झालेला आहे. त्यात विकी हा पोलिसांनी शिवीगाळ गेली. तसेच जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे रॅकॉर्ड झाले आहे.

दरम्यान या घटनेचा तपास राज्य गुुन्हे अन्वेषण विभागाने सुरु केला होता. शाखेच्या उपअधिक्षक निलीमा कुलकर्णी व पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती. परंतु मृत्यु हा पोलिस कोठडीत झाला नसल्याने या प्रकरणाचा तपास करण्यास सीआयडीने नकार दिल्याचे पत्र पाठवल्याचे सुत्रांनी सांगीतले. विकीच्या मृतदेहाचे मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याच्या अहवाला बाबत माहिती मिळु शकली नाही. तर विकी हा आत्महत्या करणारयां पैकी नव्हता. दोन महिन्या पुर्वी एकाशी वाद झाला होता. त्यात भांडण मिटवण्यासाठी पोलिसांनी समोरच्या कडुन १० हजारांची मागणी केली होती. परंतु दोघांनी भांडण आपसात मिटवल्याने पोलिसांना पैसे मिळाले नसल्याचा राग काढल्याचा आरोप त्याचा भाऊ रोहितने केलाय. त्याच्या व्हॉईस क्लीप वरुन तो पाण्यात चालत असल्याचा तसेच वैभवचा देखील आवाज त्यात आहे. आणि त्याचा मोबाईल मात्र सुस्थितीत आहे असे तो म्हणाला.

वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी मात्र, आम्हीच सीआयडीने तपा करावा म्हणुन वरिष्ठांना कळवले होते. पहाटेच्या सुमारास विकी हा मद्यधूंद अवस्थेत बाहेर आढळला होता. त्याने महिला पोलिसशी अर्वाच्च हुज्जत घातली. त्याची चौकशी करुन सोडुन दिले पण नशेत त्याने हे सर्व कृत्य केले असे सांगीतले.